स्विर्त्झलँडमध्ये एन्जॉय करतेय जान्हवी कपूर; तुम्हीही करू शकता 'या' 5 ठिकाणांची सफर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2018 14:44 IST2018-09-19T14:43:04+5:302018-09-19T14:44:22+5:30
'धडक' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये दणक्यात पदार्पण केलेली बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या स्विर्त्झलँडमध्ये एन्जॉय करत आहे. डिझायनर मनीष मल्होत्रासोबत जान्हवी आपल्या कामातून काही दिवसांसाठी सुट्टी घेऊन स्विर्त्झलँडच्या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत आहे.

स्विर्त्झलँडमध्ये एन्जॉय करतेय जान्हवी कपूर; तुम्हीही करू शकता 'या' 5 ठिकाणांची सफर!
'धडक' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये दणक्यात पदार्पण केलेली बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या स्विर्त्झलँडमध्ये एन्जॉय करत आहे. डिझायनर मनीष मल्होत्रासोबत जान्हवी आपल्या कामातून काही दिवसांसाठी सुट्टी घेऊन स्विर्त्झलँडच्या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत आहे. स्विर्त्झलँडला स्वर्गाची उपमा देण्यात येते. तेथील निसर्ग सौंदर्याची तुम्हाला भूरळ पडल्याशिवाय राहणार नाही. जाणून घेऊयात स्विर्त्झलँडमधील अशा काही ठिकाणांबाबत जी स्विर्त्झलँडच्या सौंदर्याचं कारण बनली आहेत.
1. जंगफ्रोज
ज्यावेळी तुम्ही एखाद्या उंच ठिकाणाहून स्विर्त्झलँडचं सौंदर्य न्याहाळाल त्यावेळी तुम्ही पुन्हा एकदा स्विर्त्झलँडच्या प्रेमात पडाल. जंगफ्रोज, हे युरोपमधील सर्वात उंच पर्वतरांगांमधील एक ठिकाण आहे. त्याचप्रमाणे याठिकाणी यूरोपमधील सर्वात उंच रेल्वे स्टेशन आहे. उंच उंच पर्वरांगांमधून वाट काढत ज्यावेळी ट्रेन या स्टेशनवर जाते त्यावेळी ते दृष्य पाहणं म्हणजे एक स्वर्गसुखचं असतं. उन्हाळ्यामध्ये तुम्ही येथे आईस स्कींगची मजा घेऊ शकता.
2. जरमॅट
स्विर्त्झलँडमध्ये असलेल्या जरमॅटचीही तुम्हाला भूरळ पडल्याशिवाय राहणार नाही. हे ठिकाण डोंगरावर असून येथील हिरवळ आणि थंडावा तुम्हाला प्रसन्न करेल. येथे बाराही महिने तुम्हाला बर्फाचा आनंद घेता येतो. तुम्ही येथे क्लायम्बिंग आणि स्कीइंगचा थरारक अनुभव घेऊ शकता.
3. शिल्थॉर्न ग्लेशियर
जगभरातील काही सुंदर ग्लेशिअरपैकी एक म्हणजे शिल्थॉर्न ग्लेशियर. पाइन ग्लोरिया नावाच्या राइडमधून तुम्ही संपूर्ण ग्लेशिअरचं दृश्य पाहू शकता. येथे तुम्हाला निसर्ग सौंदर्यासोबतच सुंदर आणि चविष्ट पदार्थही ट्राय करता येऊ शकतात.
4. जंगफ्राउ माउंटन चा किनारा
स्विर्त्झलँडमधील सर्वात फेमस माउंटन जंगफ्राउच्या आजूबाजूचा हा परिसर आपल्या सौंदर्याने पर्यटकांना स्वतःकडे आकर्षित करतो. या ठिकाणी कोणतचं गाव नाही त्यामुळे येथे लोकांची संख्या जास्त नसते. पण येथील निसर्ग सौंदर्य सर्वांना आपल्याकडे आकर्षित करतो.
5. ग्लेशियर ग्रोटो
या ठिकाणी तुम्हाला सुंदर गुहा पाहण्यास मिळतील. या गुहांच्या भिंतींवरती 8450 लॅम्प्स झगमगत असतात. येथे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आणि क्रिकेटर्स यांचे ट्रेडिशनल ड्रेसेसमधील फोटोज पाहायला मिळतील.