फिरायला जाण्याचं 'असं' प्लॅनिंग केल्यास करू शकता मोठी बचत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2019 12:40 IST2019-06-01T12:29:02+5:302019-06-01T12:40:00+5:30
कोणतीही ट्रिप प्लॅन करताना सर्वातआधी नेहमीच यावर केला जातो की, कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त कसं फिरता येईल.

फिरायला जाण्याचं 'असं' प्लॅनिंग केल्यास करू शकता मोठी बचत!
(Image Credit : Wise Bread)
कोणतीही ट्रिप प्लॅन करताना सर्वातआधी नेहमीच यावर केला जातो की, कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त कसं फिरता येईल. ट्रिप एन्जॉय करता यावी आणि शक्य तितकी बचत करावी. एखादी ट्रिप प्लॅन केलेली असेल तर हे सुद्धा शक्य आहे. चला जाणून घेऊ ट्रिप प्लॅन करताना कोणत्या कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, जेणेकरून तुमची बचत होईल.
बजेटवर फोकस
सर्वातआधी हे बघा की, तुमचं बजेट किती आहे. त्या बजेटनुसार, तुमचं डेस्टिनेशन ठरवा. फिरायला जाण्याचं बजेट ठरवताना त्यात छोट्या-मोठ्या सर्वच खर्चांचा समावेश करण्याचा प्रयत्न करा. जसे की, एअरपोर्टपासून हॉटेलला पोहोचण्याचं भाडं इत्यादी.
क्रेडीट कार्ड पॉइंट्सवर नजर टाका
क्रेडीट कार्ड पॉइंट्स कॅश केले नसतील तर ते करा. या पॉइंट्सच्या मदतीने हॉटेल बुक केल्यास तुम्हाला काही प्रमाणात सूट मिळू शकते. तसेच काही कार्ड्सवर एअर ट्रॅव्हलची तिकीट बुक केल्यास सूटही मिळते.
क्रेडीट कार्डवरील बोनस पॉइंट
असं क्रेडीट कार्ड घेऊ शकता, ज्यावर तुम्हाला बोनस पॉइंट्स मिळतील. सोबतच ट्रिप प्लॅन करताना क्रेडीट कार्डवर येणारे ऑफर्सवरही नजर टाका. कारण वेगवेगळ्या बॅंकांचे क्रेडीट कार्ड्सचे नियमही ऑफर्सबाबत वेगवेगळे असतात.
फ्लाइट तिकीटवर बेस्ट डील
फ्लाइटचं तिकीट बुक करताना वीकेंडला तिकीट बुक करणे टाळा. कारण वीकेंडला फ्लाइटचं तिकीच महाग असू शकतं. वीकेंड सोडून कधीही तिकीट बुक कराल तर तुम्हाला कमी खर्च लागू शकतो.
हॉटेलच्या बुकींगमध्ये बचत
जेव्हा आपण कुठे बाहेर जातो तेव्हा सर्वाधिक खर्च हा हॉटेलमध्ये राहण्याचा येतो. त्यामुळे ट्रिपचं आधीच प्लॅनिंग करून बेस्ट डीलदरम्यान हॉटेलची प्री-बुकिंग करून ठेवा. वेगवेगळ्या अॅप्सवर बेस्ट हॉटेल डील्स चेक करत रहा. याने तुमची बचत होऊ शकते.
खाण्यासंबंधी गोष्टी
वेगवेगळ्या लोकप्रिय ठिकाणांवर स्टूडिओ रूमही भाड्याने मिळतात. यात दैनंदिन जीवनाच्या आवश्यक सर्वच वस्तू असतात. अशी रूम रेंटवर घेऊन तुम्ही प्रवासादरम्यान होणारा खर्च कमी करू शकता. कारण तुम्ही नाश्ता आणि स्नॅक्स घरीच तयार करू शकता.