त्याच त्या ठिकाणांवर फिरून कंटाळलात? ही ऑफबीट ठिकाणे ठरतील परफेक्ट डेस्टिनेशन!  

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2019 12:39 PM2019-06-06T12:39:09+5:302019-06-06T12:39:16+5:30

जसजसा पावसाळा जवळ येतोय गरमीचा तडाखा वाढतो आहे. त्यामुळे लोक थंड हवेच्या ठिकाणी काही दिवसांसाठी वेळ घालवायला प्राधान्य देतात.

These are must visit places around Manali | त्याच त्या ठिकाणांवर फिरून कंटाळलात? ही ऑफबीट ठिकाणे ठरतील परफेक्ट डेस्टिनेशन!  

त्याच त्या ठिकाणांवर फिरून कंटाळलात? ही ऑफबीट ठिकाणे ठरतील परफेक्ट डेस्टिनेशन!  

googlenewsNext

जसजसा पावसाळा जवळ येतोय गरमीचा तडाखा वाढतो आहे. त्यामुळे लोक थंड हवेच्या ठिकाणी काही दिवसांसाठी वेळ घालवायला प्राधान्य देतात. मनाली हे त्यापैकी एक लोकप्रिय ठिकाण. उन्हाळ्यात मनालीला एकदा तर आवर्जून जायला हवं. तुम्हीही जर मनालीला जाण्याचा प्लॅन करत असाल तर आजूबाजूच्या काही खास ठिकाणांना भेट दिल्याशिवाय तुमची ट्रिप पूर्ण होऊ शकणार नाही.

वशिष्ट

(Image Credit : Himachal Tourism Guide)

वशिष्ट ते मनालीचं अंतर १९ किमी आहे आणि इथे सहजपणे पोहोचता येतं. हे एक छोटं गाव आहे, जे साधू वशिष्ट यांच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. इथे गरम पाण्याचे झरे आहेत. खासकरून हिवाळ्यात इथे लोकांची अधिक गर्दी असते. पण येथील वातावरण उन्हाळ्यातही फारच मनमोहक असतं.

जिभी

(Image Credit : TripFactory)

जर तुम्हाला अ‍ॅडव्हेंचर पसंत असेल आणि तुम्ही ३ ते ४ तास ड्राइव्ह करण्याच्या मूडमध्ये असाल तर तुमच्यासाठी हे ठिकाण परफेक्ट ठरेल. इथे तुम्हाला नैसर्गिक सुंदरता बघायला मिळेल. तुम्ही इथे होमस्टे करू शकता. येथील डोंगरांमध्ये बिनधास्तपणे फिरण्याचा अनुभव आयुष्यभर तुमच्या स्मरणात राहू शकतो. इथे लोकांची गर्दीही कमी असते.

गुलाबा

(Image Credit : Manali)

मनाली ते रोहतांग दरीच्या रस्त्यात एक छोट गाव आहे गुलाबा. मनालीपासून याचं अंतर साधारण २६ किमी असेल. या गावाचं नाव काश्मीरचे राजा गुलाब सिंह यांच्या नावावरून पडलं आहे. येथील नैसर्गिक सौंदर्य बघण्यासारखंच आहे. हे ठिकाण पिकनिकसाठी परफेक्ट आहे. इथे तुम्ही स्कीइंग आणि पॅराग्लायडिंगही करू शकता.

जगतसुख

(Image Credit : Kullu Manali)

पूर्ण वेळ मनालीमध्ये घालवण्याऐवजी तुम्ही थोडा वेळ काढून जगतसुखला भेट देऊ शकता. हे ठिकाण मनाली ते नग्गार रस्त्यावर आहे. मनालीहून इथे पोहोचण्यासाठी तुम्हाला १ तासांचा वेळ लागेल. इथे जुन्या मंदिरांना भेट देण्यासोबतच होममेड वस्तूंची खरेदीही करू शकता.

नग्गर

(Image Credit : TripAdvisor)

नग्गर हे ठिकाण मनालीपासून २१ किमी अंतरावर आहे. आउटिंगसाठी नग्गर हे ठिकाण परफेक्ट आहे. येथील बेरीजही चांगल्याच लोकप्रिय आहेत. 

Web Title: These are must visit places around Manali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.