फिरायला गेल्यावरही स्ट्रेस फ्री नसाल तर काय फायदा? या ट्रॅव्हल टिप्स करा फॉलो!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2019 01:30 PM2019-05-06T13:30:46+5:302019-05-06T13:42:41+5:30

प्रत्येकाच्या जीवनात फिरायला जाणं हा एक महत्त्वाचा भाग असतो. कारण हा वेळ आपण एखाद्या खास ठिकाणांवर परिवारासोबत, मित्रांसोबत किंवा स्वत:सोबत घालवत असतो.

For Stress free travel must try these travel tips | फिरायला गेल्यावरही स्ट्रेस फ्री नसाल तर काय फायदा? या ट्रॅव्हल टिप्स करा फॉलो!

फिरायला गेल्यावरही स्ट्रेस फ्री नसाल तर काय फायदा? या ट्रॅव्हल टिप्स करा फॉलो!

googlenewsNext

(Image Credit : TravelTriangle)

प्रत्येकाच्या जीवनात फिरायला जाणं हा एक महत्त्वाचा भाग असतो. कारण हा वेळ आपण एखाद्या खास ठिकाणांवर परिवारासोबत, मित्रांसोबत किंवा स्वत:सोबत घालवत असतो. अशात कधी कधी ट्रिपदरम्यान फार स्ट्रेसही येतो. म्हणजे अनेकदा घाईगडबडीत आपण कोणत्याही जागेची निवड करतो किंवा प्रवाससाठी आवश्यक गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. सामान्यपणे सगळेजण हे टेन्शन घालवण्यासाठी आणि आराम करण्यासाठी फिरायला जातात. पण ट्रिपमुळे तणाव येऊ नये यासाठी खालील काही गोष्टींची काळजी घ्यावी.

विचार करून जागेची निवड

(Image Credit : The Intrepid Guide)

तुम्ही कुठेही जाण्याचा प्लॅन करत असाल तर आधी हे बघा की, तुम्ही कुणासोबत जाणार आहात. म्हणजे कुटूंबियांसोबत, मित्रांसोबत किंवा एकटे. त्यानंतर जागेचा आवडीनुसार शोध सुरू करा. एकदा जर हे क्लिअर झालं तर ज्या ठिकाणी जायचं आहे, त्या ठिकाणाबाबत सोशल साइट्सवर रेटिंग्स, फोटो, कसे जाल, कुठे फिराल हे जाणून घ्या. 

वेगवेगळ्या ठिकाणांना एक्सप्लोर करा

(Image Credit : Go Curry Cracker!)

कोणत्याही ठिकाणी फिरायला जाणार असाल सर्वात गरजेचं असतं की, तुम्ही कधी जाणार किंवा तुम्ही कधी फ्री असाल. तसेच तुमच्याकडे वेळ किती आहे. म्हणजे एका ठिकाणी जाऊन परत यायचंय कि वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देणार आहात. त्यामुळे तुमच्या वेळेचा विचार करूनच वेगवेगळ्या ठिकाणांना एक्सप्लोर करा. 

बजेटचा विचार

(Image Credit : Quartz)

फिरायला जाण्याआधी तुमचं बजेट डिसाइड करा. त्यानंतर कुठे जाणार आहात? किती खर्च करू शकता? याचा प्लॅन करा. तसेच तुमच्या ओळखीचं कुणी आधीच त्या ठिकाणावर जाऊन आलं असेल त्यांच्याकडून खर्चाची माहिती घ्या. याने तुम्हाला कळेल की, तुमच्याकडे किती पैसे हवेत. 

सोशल मीडिया आणि मॅगझिनची मदत

(Image Credit : The Jakarta Post)

सोशल मीडियावर ट्रॅव्हल डेस्टिनेशनचे फोटो, ठिकाणांची माहिती आणि तेथील खाण्या-पिण्याबाबत अनेक रिव्ह्यू असतात. त्यानुसारही तुम्ही ट्रिप प्लॅनिंग करू शकता. पण अनेकदा खोट्या गोष्टींची माहितीही दिलेली असते. यापासून बचावासाठी कोणत्याही एका साइटवर विश्वास ठेवण्यापेक्षा वेगवेगळ्या साइट्सवरून माहिती मिळवा. किंवा वेगवेगळे ट्रॅव्हल संबंधित मॅगझिन चेक करा. 

काय करावे-काय नाही लिस्ट...

(Image Credit : codeburst)

स्ट्रेस फ्री हॉलिडेसाठी काय करावे आणि काय करू नये ही लिस्ट फारच कामात येते. यात तुम्हाला कधी, कुठे आणि कसे जायचे आहे? तसेच तुमचं बजेट  लिहिलेलं असतं. त्यासोबतच ट्रिपदरम्यान तुम्हाला फार काही विचार करण्याची गरजही पडत नाही. तुम्ही बिनधास्त होऊन ट्रिप एन्जॉय करू शकता. 

सोशल साइट्सपासून दुरावा

(Image Credit : SquarePlanet)

फिरायला गेल्यावर सोशल साइट्सना दूर ठेवा. हा वेळ तुम्ही पूर्णपणे कुटूंबाला, मित्रांना किंवा स्वत:ला द्यावा. लगेच फिरायला गेले त्या ठिकाणाचे फोटो शेअर करण्यात वेळ घालवू नका. असे केले तर तुम्ही पूर्णपण एन्जॉय करू शकणार नाहीत. पण एकटे फिरायला जात असाल तर मित्रांसोबत किंवा कुटूंबातील कुणासोबत तुमचं लोकेशन नक्की शेअर करा. 

Web Title: For Stress free travel must try these travel tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.