जगात अशी अनेक ठिकाणे असतात जी जगातली सर्वात धोकादायक ठिकाणे असूनही नेहमी चर्चेत असतात. या ठिकाणांवर सर्वसामान्य लोकांना येण्या-जाण्यासाठी बंदी घातलेली असते आणि तर काही ठिकाणांवर ठराविक लोकांनाच जाण्याची परवानगी असते. म्हणजे या ठिकाणांवर जाणं तुमच्या जीवावर बेतू शकतं. चला जाणून घेऊ जगातली ही धोकादायक ठिकाणे...

नॉर्थ सेंटिनल आयलॅंड, भारत

अंदमान द्वीप समूहात असलेलं नॉर्थ सेंटिनल बेट. हे बेट आपल्या खास संदरतेसाठी ओळखलं जातं. येथील काही आदिवासी लोकांना बाहेरील जगाशी संपर्क ठेवायचा नाहीये. जर कुणी त्यांच्या परिसरात शिरण्याचा प्रयत्न केला तर ते कथित रूपाने त्या लोकांना जीवे मारतात. त्यामुळे या बेटावर जाण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे.

सर्टसे, आइसलॅंड

हे जगातलं सर्वात कमी वयाचं बेट आहे. हे आइसलॅंडच्या दक्षिण तटावर वेस्टमॅनाइजर द्वीप समूहात आहे. इथे ज्वालामुखीचा स्फोट झाला होता. चार वर्षांपर्यंत या ज्वालामुखीतून लावारस बाहेर येत होता. त्यामुळे इथे केवळ वैज्ञानिकच जाऊ शकतात.

डेथ व्हॅली, अमेरिका

इथे जगातलं सर्वात जास्त तापमान असतं. इथे पृथ्वीवरील सर्वात जास्त ५६.७ डिग्री सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. तुम्ही कितीही मजबूत असाल तरी येथील गरमीत तुम्ही १४ तासांपेक्षा जास्त वेळ थांबू शकत नाही.

माउंट वॉशिंग्टन, अमेरिका

(Image Credit ; wmur.com)

माउंट वॉशिंग्टन शिखराच्या टोकावर जगात सर्वात जास्त वेगाने हवा चालते. इथे २०३ मैल प्रति तास म्हणजे ३२७ किलोमीटर प्रति तास वेगाने चालणाऱ्या हवेचा रेकॉर्ड आहे. हवेसोबतच इथे शून्यापेक्षा ४० डिग्री खाली तापमान जातं. 

मादिदी नॅशनल पार्क, बोलिविया

तसा तर हा नॅशनल पार्क फार सुंदर दिसतो, पण हा पार्क फारक धोकादायक आहे. कारण इथे जगातली सर्वात विषारी आणि घातक वनस्पती आढळतात. येथील कोणत्याही झाडाच्या फांदीचा जर शरीराला स्पर्श झाला तर खाज आणि चक्कर येण्यास सुरूवात होते.


Web Title: Some dangerous places on this planet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.