जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 14:16 IST2025-08-04T14:09:42+5:302025-08-04T14:16:53+5:30

Sara Tendulkar: कोट्यवधींच्या प्रोजेक्टसाठी अख्ख्या भारतातून सारा तेंडुलकरचा चेहरा निवडण्यात आला आहे

Sara Tendulkar brand ambassador of Australia tourism the Come and Say Gday campaign of 1137 crores | जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी

जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी

Sara Tendulkar: दिग्गज आजी-माजी क्रिकेटपटूंच्या स्टारकिड्सपैकी सर्वाधिक चर्चेत असणारी म्हणजे सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर. सध्या ती ११३७ कोटींच्या एका प्रोजेक्टमुळे चर्चेत आली आहे. सारा तेंडुलकर ही एका खूप मोठ्या मोहिमेचा भाग होणार आहे. ही मोहीम ऑस्ट्रेलियाशी (Australia tourism) संबंधित आहे. सारा तेंडुलकर त्या मोहिमेचा भाग बनून (brand ambassador)ऑस्ट्रेलियाला मदत करणार आहे. ऑस्ट्रेलियाची ही नवी मोहिम तब्बल ११३७ कोटी रुपयांची असून, सारा त्याचा भाग असणार आहे.


काय आहे हे प्रोजेक्ट?

जगातील अनेक देशांमध्ये ऑस्ट्रेलियाची नवीन पर्यटन मोहीम सुरू होणार आहे. या पर्यटन मोहिमेसाठी ऑस्ट्रेलियाने प्रत्येक देशातून एक चेहरा निवडला आहे. जेणेकरून त्या देशांतील लोक ऑस्ट्रेलियाला जास्तीत जास्त भेट देण्यासाठी येतील आणि ऑस्ट्रेलियाचे पर्यटनातून मिळणारे उत्पन्नही वाढेल.

भारतातून सारा तेंडुलकरची निवड

ऑस्ट्रेलिया त्यांची ही महत्त्वाकांक्षी मोहीम भारत, युनायटेड किंग्डम, चीन, जपान, अमेरिका यांसारख्या देशांमध्ये सुरू करणार आहे. त्यांनी त्या प्रत्येक देशातून एका सेलिब्रिटीला प्रोजेक्टचा भाग बनवले आहे. सारा तेंडुलकरला भारतात ऑस्ट्रेलियन पर्यटनाला प्रोत्साहन देण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.


साराने नुकताच केला होता संपूर्ण ऑस्ट्रेलिया दौरा

सारा तेंडुलकरला ऑस्ट्रेलियाबद्दल विशेष आकर्षण आहे. तिने त्या देशाला अनेक वेळा भेट दिली आहे आणि तो देश एक्सप्लोर केला आहे. तिने ऑस्ट्रेलियातील जवळजवळ प्रत्येक पर्यटन स्थळाला भेट दिली आहे आणि त्याचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. साराच्या या मोहिमेचा भाग म्हणून तिला ऑस्ट्रेलियाचे सहकार्य लाभले होते. त्यातच आता सारा भारतात ऑस्ट्रेलियातील पर्यटनस्थळांचा प्रचार करणार असल्याने तिच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे.

Web Title: Sara Tendulkar brand ambassador of Australia tourism the Come and Say Gday campaign of 1137 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.