पावसाळ्यातील वीकेंड एन्जॉय करायचाय?; मग 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2019 04:05 PM2019-07-08T16:05:45+5:302019-07-08T16:06:57+5:30

बरसणारा पाऊस आणि मस्त लॉन्ग ड्राइव्ह... किंवा मग एखाद्या मस्त थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जाणं.... प्रत्येकाचेच वेगवेगळे प्लॅन असतात.

Perfect weekend getaways from mumbai in rainy season | पावसाळ्यातील वीकेंड एन्जॉय करायचाय?; मग 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!

पावसाळ्यातील वीकेंड एन्जॉय करायचाय?; मग 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!

Next

(Image Credit : Thrillophilia)

बरसणारा पाऊस आणि मस्त लॉन्ग ड्राइव्ह... किंवा मग एखाद्या मस्त थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जाणं.... प्रत्येकाचेच वेगवेगळे प्लॅन असतात. तुम्हीही असाच प्लॅन करण्याच्या विचारात असाल तर आज आम्ही तुम्हाला काही खास ठिकाणांबाबत सांगणार आहोत. या ठिकाणांना पावसाळ्यात भेट देण्याची मजा काही औरच... जर तुम्ही मुंबईत राहत असाल आणि वीकेंडला फिरण्यासाठी ऑप्शन शोधत असाल, तर ही ठिकाणं फक्त तुमच्यासाठीच... पावसाळ्यात या ठिकाणांचं सौंदर्य आणखी बहरतं...

महाबळेश्वर-पाचगणी

मुंबईपासून जवळपास 263 किलोमीटर अंतरावर असलेलं महाबळेश्वर महाराष्ट्रातील त्या ठिकाणांपैकी एक आहे जिथे सर्वात जास्त पाऊस पडतो. नैसर्गिक सौंदर्याने नटलेलं हे ठिकाण मन प्रसन्न करतं. हे सर्वात लोकप्रिय ठिकाणांपैकी एक आहे. तसेच महाबळेश्वरपासून 20 किलोमीटर अंतरावर पाचगणी हिल स्टेशन आहे. महाबळेश्वरच्या तुलनेमध्ये येथे फार कमी पाऊस पडत असला तरिही नैसर्गिक सौंदर्यासाठी हे अत्यंत सुंदर आहे. येथए तुम्ही मेप्रो गार्डन, वेना तलाव, प्रातपगड किल्ला, लिंगमाला झरा, एलीफंट्स हेड पॉइंट पाहू शकता.


 
कर्नाळा

कर्नाळा मुंबईपासून जवळपास 80 किलोमीटर अंतरावर आहे. पावसाळ्यामध्ये अनेक पर्यटक येथे येत असतात. मान्सूनमध्ये धुक्याने झाकलेल्या सह्याद्रीच्या डोंगररांगा फार सुंदर दिसतात. अशा प्रसन्न वातावरणामध्ये येथील कर्नाळ्याचा धबधबा पाहणं म्हणजे सुखचं. येथे तुम्ही कर्नाळ्याच्या किल्ल्यालाही भेट देऊ शकता. याव्यतिरिक्त येथील आकर्षण म्हणजे, येथील कर्नाळा बर्ड सेच्युरी. येथे जवळपास 37 प्रवासी पक्षांच्या प्रजाती आढळून येतात. 

लोणावळा

मुंबईपासून 96 किलोमीटर अंतरावर लोणावळ्यामध्ये तुम्ही पावसाचा आनंद घेऊ शकता. शांत आणि प्रसन्न करणाऱ्या लोणावळ्यातील वातावरणामुळे याला महाराष्ट्रातील  स्वीत्झर्लन्ड म्हटलं जातं. पण पावसाळ्यामध्ये तुम्हाला याचं एक वेगळचं रूप पाहायला मिळतं. घनदाट जंगल, धबधबे यांसारख्या गोष्टी तुमची लोणावळ्याची ट्रिप आणखी खास करतात. 

माळशेज घाट 

मुंबईपासून माळशेज घाट जवळपास 127 किलोमीटर अंतरावर आहे. डोंगरावर असलेल्या माळशेज घाटामध्ये हिरवळीसोबतच अनेक धबधब्यांचा आनंद घेता येतो. पावसाळ्यामध्ये येथील सौंदर्य आणखी वाढतं. येथे अनेक सुंदर रिसॉर्ट आहेत, जिथे तुम्ही राहू शकता. हरिश्चंद्र फोर्ट ट्रेक, अजूबा हिल फोर्ट, पिंपळगाव डॅम ही येथील प्रमुख आकर्षणं आहेत. 

Web Title: Perfect weekend getaways from mumbai in rainy season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.