शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

पर्यटकांनो लक्ष द्या! हाँगकाँग 5 लाख पर्यटकांना मोफत विमान तिकीट आणि व्हाउचर देणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2023 11:34 IST

हाँगकाँग पर्यटन मंडळाने हॅलो हाँगकाँग ( Hello, Hong Kong) या नावाने ही ऑफर सुरू केली आहे

कोरोना महामारीनंतर भारतासह जगभरातील अनेक देशातील पर्यटनस्थळे उघडण्यात आली आहेत. कोरोनानंतर हाँगकाँग सुद्धा पुन्हा एकदा जगभरातील पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. आपल्या देशात खुलेआम प्रवाशी आणि पर्यटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हाँगकाँग पर्यटन मंडळाकडून विशेष ऑफर दिली जात आहे.

हाँगकाँग पर्यटन मंडळाने हॅलो हाँगकाँग ( Hello, Hong Kong) या नावाने ही ऑफर सुरू केली आहे. जवळपास पाच लाख प्रवाशांना हजारो एअर तिकीट आणि व्हाउचरच्या माध्यमातून मोफत विमान तिकीट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे देशातील पर्यटनाला चालना मिळणार आहे. हाँगकाँग शहरातील टूरसाठी पर्यटन मंडळाने ही बंपर ऑफर आणली आहे.

हाँगकाँग पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्जएअरलाइन्सला पाठिंबा देण्यासाठी मोफत तिकिटे खरेदी करण्यात आली आहेत. आता कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू संपत आहे, असे हाँगकाँग पर्यटन मंडळाचे कार्यकारी संचालक डॅन चेंग म्हणाले. तसेच, हाँगकाँग पर्यटन मंडळाने अधिकृत ट्विटमध्ये म्हटले आहे की, "हॅलो, हाँगकाँग! आम्ही तुमचे परत स्वागत करण्यास उत्सुक आहोत. हाँगकाँगच्या अॅरॉन क्वोक आणि सॅमी च्युंग सारख्या स्टार्सच्या वेषभूषा करताना या शहराला जाणून घ्या. हाँगकाँगचा आनंद लुटण्यासाठी तुम्हाला पाच लाख मोफत विमान तिकिटे आणि व्हाउचर दिले जात आहेत."

खूप दिवसांपासून हाँगकाँगला जायला घाबरत होते परदेशी पर्यटककोरोना महामारीमुळे हाँगकाँग बरेच दिवस बंद होते. बऱ्याच दिवसांपासून कोणताही परदेशी पर्यटक या शहरात जाण्यास घाबरत होता. तसेच अलिकडच्या काही महिन्यांतील कोविड प्रवास निर्बंध आता मागे घेण्यात आले आहेत. गेल्या तीन वर्षांत पर्यटकांच्या कमतरतेमुळे हाँगकाँगच्या पर्यटन उद्योगाला मोठा फटका बसला आहे.

कोविड धोरणांमुळे पर्यटकांची संख्या घटली2020 पर्यंत जगातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळ हाँगकाँगमध्ये कोरोना महामारी सुरू होण्याच्या एका वर्षापूर्वी पाच कोटी 60 लाख पर्यटकांपर्यंत पोहोचले होते. परंतु, कोरोना निर्बंध आणि चीनच्या झिरो कोविड धोरणांमुळे त्यांची संख्या लक्षणीयरीत्या घटली आहे. आता शहराला त्याच्या पर्यटन उद्योगाद्वारे कोरोना साथीच्या रोगाच्या व्यापक प्रभावातून सावरण्याची आशा आहे. विमानतळ प्राधिकरण हाँगकाँगचे मुख्य कार्यकारी फ्रेड लॅम टिन फूक यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोफत तिकिटे हाँगकाँग-आधारित एअरलाइन्स कॅथे पॅसिफिक, एचके एक्सप्रेस आणि हाँगकाँग एअरलाइन्सद्वारे वितरित केली जातील. पर्यटक आपल्या वेबसाइटला भेट देऊन संपूर्ण माहिती मिळवू शकता. 

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सInternationalआंतरराष्ट्रीयtourismपर्यटन