तुरूंगात कैद्यांसारखं राहण्याची इच्छा आहे? इथे ५०० रूपये देऊन होईल इच्छा पूर्ण!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2019 14:51 IST2019-03-14T14:43:28+5:302019-03-14T14:51:43+5:30
भारतातील सर्वात मोठं तुरूंग तिहार जेल. जवळपास ४०० एकर परिसरात पसरलेल्या या तरूंगात हजारो कैदी बंद आहेत.

तुरूंगात कैद्यांसारखं राहण्याची इच्छा आहे? इथे ५०० रूपये देऊन होईल इच्छा पूर्ण!
(Image Credit : India Today)
भारतातील सर्वात मोठं तुरूंग म्हणजे तिहार जेल. जवळपास ४०० एकर परिसरात पसरलेल्या या तरूंगात हजारो कैदी बंद आहेत. या तुरूंगातील कैद्यांचं जीवन सावरण्यासाठी येथील अधिकाऱ्यांनी काही महत्त्वाची पावले उचलली आहेत. रॉक बॅंडपासून ते हस्तकला हे सगळंच येथील कैद्यांना शिकवलं जातं.
बॉलिवूड स्टार्सपासून ते अनेक दहशतवादीही या तुरूंगाच्या चार भींतीमागे राहिले आहेत. तरूंगाची जी इमेज वेगवेगळ्या सिनेमांमधून आपल्या मनात तयार करण्यात आली आहे. त्यानुसार अनेकांना Jail Feeling म्हणजे तरूंगात कसं लाइफ असतं हे जाणून घ्यायचं असतं.
याच तिहार तरूंगाने लोकांना हा अनुभव घेण्याची संधी आणली आहे. Tripoto ने दिलेल्या रिपोर्टनुसार, पर्यटक म्हणून तिहार तुरूंगात जाऊन दिवसभर राहणं शक्य आहे. तिहार तुरूंगाच्या व्यवस्थापनाने या पर्यटन प्रोजेक्टचं नाव 'Feel Like Jail' असं ठेवलं आहे.
पर्यटकांना राहण्यासाठी कोठड्या तयार करण्यात आल्या आहेत. यात बाथरूम आणि टॉयलेट्सचीही सुविधा असेल. खरे तुरूंग आणि या तुरूंगाच्या मधे एक भींत असेल. यात खोट्या कैद्यांना(पर्यटकांना) खऱ्या कैद्यांसारखं जेवण मिळेल आणि त्यांच्यासारखंच दळणांच आणि वस्तू तयार करण्याचं काम करावं लागेल.