भारतीय चित्रपटसृष्टीचा प्रवास उलगडणारं 'नॅशनल म्युझिअम ऑफ इंडियन सिनेमा'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 04:31 PM2019-01-24T16:31:58+5:302019-01-24T16:36:33+5:30

पंतप्रधन नरेंद्र मोदींच्या हस्ते 19 जानेवारी, शनिवार रोजी दक्षिण मुंबईमधील 'नॅशनल म्यूझिअम ऑफ इंडियन सिनेमा' (NMIC)चे उद्घाटन करण्यात आले. हे म्युझिअम दक्षिण मुंबईमध्ये स्थित आहे.

National museum of indian cinema at mumbai how to reach this place | भारतीय चित्रपटसृष्टीचा प्रवास उलगडणारं 'नॅशनल म्युझिअम ऑफ इंडियन सिनेमा'

भारतीय चित्रपटसृष्टीचा प्रवास उलगडणारं 'नॅशनल म्युझिअम ऑफ इंडियन सिनेमा'

Next

पंतप्रधन नरेंद्र मोदींच्या हस्ते 19 जानेवारी, शनिवार रोजी दक्षिण मुंबईमधील 'नॅशनल म्यूझिअम ऑफ इंडियन सिनेमा' (NMIC)चे उद्घाटन करण्यात आले. हे म्युझिअम दक्षिण मुंबईमध्ये स्थित आहे. हे म्युझिअम तयार करण्यासाठी चार वर्ष लागली असून त्यासाठी तब्बल 140.61 कोटी रूपये खर्च करण्यात आले आहेत. दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या अध्यक्षतेखाली आणि सल्लागार समितीच्या मार्गदर्शनाखाली 'नॅशनल म्युझिअम ऑफ इंडियन सिनेमा' हे तयार करण्यात आलं आहे. 

उद्घाटनप्रसंगी ज्यावेळी पंतप्रधानांनी बोलण्यास सुरुवात केली त्यावेळी त्यांनी एका चित्रपटाच्या डायलॉगने सुरुवात केली. मोदींनी काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या उरी (URI) चित्रपटातील फेमस डॉयलॉग 'How's the जोश?' असं विचारलं आणि पाहताच क्षणी उपस्थित श्रोत्यांनी 'High Sir!' असं उत्तर दिलं. तसेच पंतप्रधानांनी या म्युझिअमचं अत्यंत बारकाईने निरिक्षण देखील केलं. 

म्युझिअमचे वैशिष्ट्य

'नॅशनल म्युझिअम ऑफ इंडियन सिनेमा'मध्ये भारतीय सिनेसृष्टीचा इतिहास उलगडण्यात आला आहे. तसेच येथे लहान मुलांसाठी बालचित्रपटांचीही मेजवाणी आहे. या म्युझिअमची सफर केल्याने प्रत्येक व्यक्तीला भारतीय चित्रपटसृष्टीचा प्रवास जाणून घेण्यास मदत होईल. तसेच सध्याच्या चित्रपटांमध्ये वापरण्यात येणाऱ्या अद्ययावत तंत्रज्ञानाबाबतही सांगण्यात येणार आहे. 

यशोगाथा

'नॅशनल म्यूझिअम ऑफ इंडियन सिनेमा'मध्ये बॉलिवूडच्या प्रत्येक टप्प्यावरचा इतिहास सांभाळून ठेवण्यात आला आहे. येणाऱ्या पुढच्या पिढ्यांनाही आपल्या पूर्वजांचा संघर्ष, रचनात्मकता, विचार आणि कला जाणून घेण्यास मदत होणार आहे. 

कसं पोहोचाल?

'नॅशनल म्यूझिअम ऑफ इंडियन सिनेमा' सर्वांच्या स्वप्नांचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मुंबईमध्ये स्थित आहे. येथे पोहोचण्यासाठी तुम्हाला 'गुलशन महल, 24, पेडर रोड, कुंबाला हिल, मुंबई' या पत्त्यावर भेट द्यावी लागेल. येथे फिरण्यासाठी तिकिटाची व्यवस्था करण्यात आली असून भारतीय नागरिकांसाठी प्रति व्यक्ती 20 रूपये इतके शुल्क आकारण्यात येणार आहे. 

Web Title: National museum of indian cinema at mumbai how to reach this place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.