गुलाबी थंडीची दुप्पट नशा अनुभवायची असेल तर 'इथे' द्या भेट, पैसा वसूल ट्रिपचा करा प्लॅन!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2019 05:17 PM2019-12-06T17:17:18+5:302019-12-06T17:27:49+5:30

या हिवाळ्यात जर फिरायला जायचा प्लॅन करत असाल तर कोणताही वेळ न घालवता लगेच तयारीस लागा.

Most popular and interesting place in india | गुलाबी थंडीची दुप्पट नशा अनुभवायची असेल तर 'इथे' द्या भेट, पैसा वसूल ट्रिपचा करा प्लॅन!

गुलाबी थंडीची दुप्पट नशा अनुभवायची असेल तर 'इथे' द्या भेट, पैसा वसूल ट्रिपचा करा प्लॅन!

Next

(image credit- Trawell.in)

या हिवाळ्यात जर फिरायला जायचा प्लॅन करत असाल तर कोणताही वेळ न घालवता लगेच तयारीस लागा. मित्रमैत्रींणीसोबत किंवा ऑफिसची मंडळीं जर कुठे जायचा प्लॅन करत असतील तर आज आम्ही तुम्हाला भारतातील अशा ठिकाणाबद्दल सांगणार आहोत. ज्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला आणि तुमच्या कुटूंबाला थंडीचा आनंद पूर्णपणे लुटता येईल.

भारतात थंडीचा आनंद घेण्यासाठी प्रसिध्द अशी खूप स्थळ आहेत. पण काही ठिकाणं अशी आहेत जी भारतात वास्तव्यास असलेल्या लोकांना फारशी माहीत नाहीत. त्यापैकीच एक म्हणजे दार्जिलिंगपासून ५८ किलोमीटरच्या अंतरावर असलेले कलिम्पोंग हे निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे. हे शहर निसर्गाच्या कुशीत वसलेले आहे. आणि आपल्या मनमोहक निसर्गसौंदर्यासाठी ते प्रसिध्द आहे. हे एक लहानसे थंड हवेचे ठिकाण आहे. या ठिकाणी रहदारी फार कमी असते. त्यामुळे या परीसरात गेल्यानंतर शांतता जाणवते. तसेच या शहराच्या सुंदर नजाऱ्यांसाठी हे शहर आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरलं आहे.


रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातुन ज्या लोकांना शांतता हवी असते. तो लोक कलिम्पोंग या शहराला नक्की भेट देतात. या ठिकाणी गोरखालँड टेरिटेरियल अ‍ॅडमिनिस्ट्रेशनमार्फत  कलिम्पोंग येथे एक नवीन विकास प्रकल्प तयार केला जाणार आहे. यामुळे कलिम्पोंग  हे पर्यटन स्थळ अधिक विकसीत होण्याच्या मार्गावर आहे.


या ठिकाणी बोटिंग सुध्दा सुरू करण्यात आली आहे. येथील बोटिंग कॉम्प्लेक्सचे नाव 'नोक-दारा टूरिस्ट कॉम्प्लेक्स' असे आहे. सुंदर लॉन आणि लांबचलांब असलेसी हिरवळ यांनी वेढलेली ही 'नोक-दारा टूरिस्ट कॉम्प्लेक्स' आहे. जे लोक दार्जिलिंग या ठिकाणी पर्यटनाचा आनंद घ्यायला जातात. ते  कलिम्पोंग या सुंदर स्थळाला भेट दिल्याशिवाय राहत नाहीत. कलिम्पोंग हे ठिकाण बाजारपेठेसाठी सुध्दा प्रसिध्द आहे. इथे भूटान, सिक्‍किम, नेपाळ या ठिकाणचे बरेच लोक शॉपींग करण्यासाठी येतात.

Web Title: Most popular and interesting place in india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.