मिलिंद-अंकिता हवाईमध्ये करताहेत हनीमून एन्जॉय, हे आहेत येथील 4 बेस्ट स्पॉट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2018 11:39 IST2018-05-14T11:39:24+5:302018-05-14T11:39:24+5:30

बॉलिवूड अभिनेता आणि फिटनेस आयकॉन मिलिंद सोमण आणि त्याची पत्नी अंकिता कोंवर हवाईमध्ये सध्या हनीमून एन्जॉय करत आहे.

Milind soman and Ankita honeymoon top tourist spots in Hawaii | मिलिंद-अंकिता हवाईमध्ये करताहेत हनीमून एन्जॉय, हे आहेत येथील 4 बेस्ट स्पॉट

मिलिंद-अंकिता हवाईमध्ये करताहेत हनीमून एन्जॉय, हे आहेत येथील 4 बेस्ट स्पॉट

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आणि फिटनेस आयकॉन मिलिंद सोमण आणि त्याची पत्नी अंकिता कोंवर हवाईमध्ये सध्या हनीमून एन्जॉय करत आहे. दोघांनी गेल्या महिन्यात 22 एप्रिला लग्न केले होते. नुकतेच दोघांनी आपल्या हमीमूनचे काही खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. हवाई हे ठिकाण हनीमूनसाठी चांगलंच लोकप्रिय आहे. चला जाणून घेऊया या ठिकाणाचे वैशिष्ट्य....

1)  वायकीकि

वायकीकि हा एक खास बीच असून हवाईतील सर्वात मोठं आकर्षण आहे. इथे तुम्ही समुद्राचा मनसोक्त आनंद लुटू शकता. इथे सर्वच सुविधा उपलब्ध आहेत. त्यासोबत इथे डायमंड हेड नावाचा एक ज्वालामुखीही आहे. 

2) वाल्कॅनो नॅशनल पार्क

हवाईच्या बीग आयलंडवर वाल्कॅनो नॅशनल पार्क एक सक्रिय ज्वालामुखी पर्वत आहे. इथे तुम्ही अॅक्टीव वाल्कॅनो जवळून बघू शकता.  

3) पर्ल हार्बर

पर्ल हार्बर हे नौसेनेचं केंद्र आहे. यूएसएस एरिझोना बुडून मरण पावलेल्यांचं इथे स्मारक आहे. इथे जपानने केलेल्या हल्ल्याची माहिती दिली जाते. 

4) वायपियो व्हॅली

हवाईच्या बीग आयलंडवरील सर्वात सुंदर जागा म्हणून वायपियो व्हॅली प्रसिद्ध आहे. डोंगरांनी झाकलेला हा परिसर समुद्रात उघडला जातो. 

Web Title: Milind soman and Ankita honeymoon top tourist spots in Hawaii