अद्भूत! एक असा देश जिथे ४० मिनिटात पुन्हा उगवतो सूर्य, अर्ध्या रात्रीच होते सकाळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 11:47 IST2024-12-12T11:32:12+5:302024-12-12T11:47:41+5:30
Land of the midnight sun : यूरोप महाद्वीपात एक असाही देश आहे जिथे रात्र केवळ ४० मिनिटांची असते? इथे सूर्य अर्ध्या रात्रीनंतर मावळतो आणि काही वेळातच आश्चर्यकारकपणे पुन्हा सकाळ होते.

अद्भूत! एक असा देश जिथे ४० मिनिटात पुन्हा उगवतो सूर्य, अर्ध्या रात्रीच होते सकाळ!
Land of the midnight sun : १२ तास दिवस आणि १२ तास रात्र असं २४ तासाचं रोजचं चक्र असतं. सूर्य किरणे एका ठरलेल्या वेळेत पृथ्वीवर पडतात. मात्र, पृथ्वीवर सूर्य उगवण्याची वेळ वेगवेगळी असते. भारत आणि अमेरिकेच्या घड्याळात बरंच अंतर आहे. पृथ्वीवरील वेगवेगळ्या देशांमध्ये दिवसाची लांबी वेगवेगळी असते. कुठे दिवस खूप मोठा असतो तर कुठे रात्र मोठी असते. पण तुम्हाला माहीत आहे का की, यूरोप महाद्वीपात एक असाही देश आहे जिथे रात्र केवळ ४० मिनिटांची असते? इथे सूर्य अर्ध्या रात्रीनंतर मावळतो आणि काही वेळातच आश्चर्यकारकपणे पुन्हा सकाळ होते.
४० मिनिटांची रात्र
नॉर्वे हा यूरोपमधील खूप सुंदर देश आहे जो आर्कटिक सर्कलमध्ये आहे. या देशातील सगळ्यात मोठं आकर्षण म्हणजे इथे मे ते जुलै दरम्यान जवळपास ७६ दिवसांपर्यंत सूर्य कधीच मावळत नाही. याचा अर्थ असा आहे की, १२.४३ वाजता सूर्य मावळतो आणि केवळ ४० मिनिटांनंतर रात्री १.३० वाजता सूर्य पुन्हा उगवतो. या कारणानेच नॉर्वेला 'लॅंड ऑफ मिडनाइट सन' नावानेही ओळखलं जातं.
अर्ध्या रात्री बघू शकता सूर्य
ही घटना नॉर्वेच्या भौगोलिक स्थितीमुळे होते. आर्कटिक सर्कलजवळ असल्याने उन्हाळ्यात सूर्याची किरणे या भागावर थेट पडतात आणि जास्त वेळ दिवसाची जाणीव होते. हा सुंदर आणि अद्भुत नजारा बघण्यासाठी जगभरातील पर्यटक इथे येत असतात. अर्ध्या रात्रीच्या सूर्यासोबतच नॉर्वेमध्ये फ्यॉर्ड्स, ग्लेशियर आणि उत्तर लाइट्ससारखे नॅचरल आकर्षणही आहेत.
नॉर्वेला 'लॅंड ऑफ मिडनाइट सन' म्हटलं जातं कारण इथे मे ते जुलैपर्यंत सूर्य जवळपास ७६ दिवस ४० मिनिटांपेक्षा जास्त वेळेसाठी मावळत नाही. उत्तर ध्रुवाच्या जवळ असल्याने इथे वर्षभर थंडी राहते. बर्फाने झाकले गेलेले डोंगर आणि ग्लेशियर येथील मुख्य आकर्षण असता. पर्यटन येथील मुख्य व्यवसाय आहे. त्यामुळे नॉर्वे जगातील सगळ्यात श्रीमंत देशांपैकी एक आहे.