एन्जॉय करण्यासाठी कोकणातली 'ही' पर्यटन स्थळं आहेत बेस्ट, कमी खर्चात जास्त मजा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2020 06:04 PM2020-02-02T18:04:46+5:302020-02-02T18:09:10+5:30

रोजच्या ऑफिसचा आणि  घरच्या कामांचा जर तुम्हाला कंटाळा आलेला असेल,

Konkan tourist destinations are the best to enjoy a trip | एन्जॉय करण्यासाठी कोकणातली 'ही' पर्यटन स्थळं आहेत बेस्ट, कमी खर्चात जास्त मजा

एन्जॉय करण्यासाठी कोकणातली 'ही' पर्यटन स्थळं आहेत बेस्ट, कमी खर्चात जास्त मजा

googlenewsNext

(image credit- trekearth.com)

रोजच्या ऑफिसचा आणि  घरच्या कामांचा जर तुम्हाला कंटाळा आलेला असेल तर आज आम्ही तुम्हाला एक खास आणि तितक्याच जवळच्या वाटत असलेल्या ठिकाणांबद्ल सांगणार आहोत ज्या ठिकाणी गेल्यांनंतर तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल.  शिवाय कुठेही फिरायला जायचं असेल तर सगळयात मोठं टेन्शन असतं ते म्हणजे बजेटचं आपल्याला नेहमीच कमीतकमी खर्चात चांगली आणि मनासारखी ट्रिप एन्जॉय करायची असते. 

कोकण म्हटलं की फक्त कोकणात गाव किंवा घर असलेल्या लोकांनाच नाही तर सगळ्यानाच आयुष्यात एकदातरी कोकणची सफर करावीशी वाटत असते. आज आम्ही तुम्हाला कोकणातील अशा काही मोजक्या ठिकाणांबद्दल सांगणार आहोत.ज्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही खूप एन्जॉय करू शकाल शिवाय या ठिकाणी पोहोचायला फारसा वेळ सुद्धा लागणार नाही. 

अलिबाग

समुद्रकिनारा अतिशय आकर्षक आहे.  बहुतेक लोक सभोवतालच्या किनार्‍याकडे जातात. रिसॉर्टपासून साध्या घरगुती राहण्याच्या सोईपर्यंत अनेक ठिकाणी राहण्याची सोय आहे. याठिकाणी अनेक मंदिरं, चर्च आणि पुरातन वास्तू आहेत. जर तुम्हाला जास्त दिवस वेळ नसेल तर तुम्ही १ किंवा २ दिवसात सुद्दा या ठिकाणी फिरायला जाऊ शकता. मुंबईपासून सुमारे  १०० किमीच्या अंतरावर हे पर्यटन स्थळ आहे. 

दापोली 

महाराष्ट्रातील सुंदर हिलस्टेशन आहे. या ठिकाणी वर्षभर थंडिचं वातावरण असतं. या ठिकाणी अनेक किल्ले आणि गुहा आहेत. ज्यामुळे पर्यटक नेहमी या ठिकाणाकडे आकर्षीत होत असतात. यामुळेच या ठिकाणाला मिनी महाबळेश्वर सुद्धा म्हणतात. अनेक महान लोकांचे या ठिकाणी निवासस्थान सुद्धा आहे. येथे गरम पाण्याचा झरा सुद्धा आहे. उन्हेरे हे नैसर्गिक गरम पाण्याच्या झऱ्यांसाठी सुप्रसिद्ध आहे. दापोली ते मुंबई जवळपास २२० किलोमीटर आहे.  पुण्यावरून जवळपास १८२ किमी दूर आहे. ( हे पण वाचा-भारतीयच नाही तर परदेशी पर्यटकांना सुद्धा भुरळ घालेलं औरंगाबादची 'ही' नवीन गोष्ट)

गणपतीपुळे

(image credit-trawell)

गणेशाच्या दर्शनसाठी महाराष्ट्रातूनच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविकांची वर्दळ येथे सुरु झाली आहे. या ठिकाणी राहण्याती उत्तम सोय आहे.  गणपतीपुळेच्या दक्षिणेस असलेला आरेवारे बीचचा समुद्रकिनारा पण खूप छान आहे. तिथलं दृश्य खूपच मनमोहक आहे. रत्नागिरी जिल्ह्यात हा समुद्र किनारा आहे. आणि पर्यटकांचं विशेष आकर्षणाचा ठिकाण आहे. याठिकणी तुम्हाला जायचं असल्यास मुंबईपासून सुमारे ३४० किली अंतरावर हे पर्यटन स्थळ आहे. (हे पण वाचा-अख्खा दिवस मोरांसोबत घालवायचा असेल तर महाराष्ट्रातील 'या' ठिकाणाला द्या भेट, खर्चही कमी...)

तारकर्ली 

तारकर्ली किनारा म्हणजे एक अरुंद किनारपट्टी आहे जी कर्ली नदी आणि अरबी समुद्राच्या संगमावर आहे. हा किनारा पारदर्शक स्वच्छ पाण्यामुळे लोकप्रिय आहे. तारकर्ली किनाऱ्याला सिंधुदुर्गचा क्विन बिच असंही म्हणतात. तारकर्ली किनाऱ्यावर स्नोर्केलींग आणि स्कूबा डायव्हींगचा अनुभव देखील घेता येतो. मालवणी पदार्थांचा आस्वादही इथे घेता येतो. सी फूड लवर्ससाठी हे ठिकाण खूप इन्जॉय करता येण्यासारखं आहे.  मुंबईपासून ४८५ किलोमीटर अंतरावर आहे.

Web Title: Konkan tourist destinations are the best to enjoy a trip

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.