भारतीयच नाही तर परदेशी पर्यटकांना सुद्धा भुरळ घालेलं औरंगाबादची 'ही' नवीन गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2020 12:19 PM2020-01-31T12:19:54+5:302020-01-31T12:21:00+5:30

सुट्टी इन्जॉय करण्यासाठी जर तुम्ही महाराष्ट्रातील औरंगाबाद या पर्यटनस्थळी भेट देण्याचा विचार करत असाल

Japanese restaurant in aurangabad of maharashtra | भारतीयच नाही तर परदेशी पर्यटकांना सुद्धा भुरळ घालेलं औरंगाबादची 'ही' नवीन गोष्ट

भारतीयच नाही तर परदेशी पर्यटकांना सुद्धा भुरळ घालेलं औरंगाबादची 'ही' नवीन गोष्ट

Next

सुट्टी इन्जॉय करण्यासाठी जर तुम्ही महाराष्ट्रातील औरंगाबाद या पर्यटनस्थळी भेट देण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला तिथल्या खाद्यासंस्कृतीच्या विस्ताराबाबत एक खास गोष्ट सांगणार आहोत. पर्यटनासाठी प्रसिध्द असेलेल्या ठिकाणापैकी महाराष्ट्रातील औरंगाबाद एक आहे. याठिकाणी अनेक ऐतिहासीक वास्तू आणि मनमोहक प्रतिकृती आहेत. सगळ्यात जास्त पर्यटकांचा ओढा या ठिकाणी असतो.

या ठिकाणच्या गुहा आणि लेणींचं सौंदर्य पाहण्यासारखे आहे. फक्त भारतातीलच  नाही तर वेगवेगळ्या ठिकाणचे पर्यटक या ठिकाणी प्राचीन वास्तु पाहण्याचा आनंद घेण्यासाठी येत असतात. अनेक बौध्द जपानी पर्यटक या ठिकाणी भेट देतात. पण औरंगाबादच्या या पर्यटन स्थळाबद्दल आज आम्ही तुम्हाला विशेष गोष्ट सांगणार आहोत. 

जर तुम्ही औरंगाबादला गेलात तर या ठिकाणी एक जपानी रेस्टॉरंट सुरू झाले आहे. त्याठिकाणी तुम्हाला भारतीय जेवणासह जपानी संस्कृतीच्या खाद्यसंस्कृतीचा आनंद घेता येईल. जपानच्या वाकायामा या ठिकाणच्या एका असोशिएशनने या रेस्टॉरंटचं उद्घाटन  केलं आहे. 

या ठिकाणी सुशी, टेंपुरा, रामेन नूडल्स, चिकन तुरीनोकरागे, मीसोसुप यासंह भारतीय पद्धतीचं जेवण सुद्धा तयार केलं जाईल. यात कढी, चपाती, तंदूरी,समोसा तसंच स्नॅक्सचे वेगवेगळे प्रकार उपलब्ध असणार आहेत. भारतीय पर्यटक या ठिकाणी जपानी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊ शकतात.( हे पण वाचा-तितली पार्कचे मनमोहक सौंदर्य बघाल तर प्रेमात पडाल, नक्की द्या भेट!)

नाकाशीनी यांच्या म्हणण्यानुसार हे रेस्टॉरंट सुरू झाल्यामुळे औरंगाबादमध्ये जपानी पर्यटकांना सुविधा उपलब्ध होईल. यात एमटीडीसीचे सकारत्मक पाऊल आहे.  जपानमधील पर्यटकांचा ओढा वाढवण्यासाठी तसंच पर्यटन व्यवसाय विकसीत करण्यासाठी रेस्टॉरंट तयार केले जात आहे. ( हे पण वाचा-अख्खा दिवस मोरांसोबत घालवायचा असेल तर महाराष्ट्रातील 'या' ठिकाणाला द्या भेट, खर्चही कमी...)

Web Title: Japanese restaurant in aurangabad of maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.