रोमॅंटिक शहर आयर्लॅंड आणि टायटॅनिक जहाजाचं कनेक्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2019 12:52 IST2019-04-12T12:43:13+5:302019-04-12T12:52:22+5:30
प्रेम करणाऱ्यांना हीर-रांझा, लैला-मजनू आणि रोमिओ ज्यूलिएट हे चांगलेच लक्षात असतात. यासोबतच टायटॅनिक जहाजही त्यांच्या मनात घर करुन असतं.

रोमॅंटिक शहर आयर्लॅंड आणि टायटॅनिक जहाजाचं कनेक्शन
(Image Credit : YouTube)
प्रेम करणाऱ्यांना हीर-रांझा, लैला-मजनू आणि रोमिओ ज्यूलिएट हे चांगलेच लक्षात असतात. यासोबतच टायटॅनिक जहाजही त्यांच्या मनात घर करुन असतं. मग अशात तुम्हालाही टायटॅनिकशी संबंधित ठिकाणाला भेट देण्याची संधी मिळाली तर? तुम्हीही पार्टनरसोबत फिरण्यासाठी अशाच एखाद्या रोमॅंटिक जागेच्या शोधात असाल तर आम्ही तुम्हाला एक खास पर्याय देत आहोत. हे ठिकाण जिथे टायटॅनिक जहाजाचं निर्माण झालं होतं ते आहे. सोबतच हेही सांगू की, हे सुंदर ठिकाण 'आयर्लॅंड' तुमच्या प्रेमाला कशाप्रकारे चार चॉंद लावेल. आयर्लॅंडच्या बेलफास्टमध्येच टायटॅनिकची बांधणी करण्यात आली होती.
आयर्लॅंड हे ब्रिटनपासून खूपआधीच वेगळं झालं होतं. पण आजही हे ठिकाण त्याच्या सौंदर्यामुळे लोकांच्या मनात घर करुन आहे. इथे फार गोंधळ नाहीये. सगळीकडे निसर्गाचं एक वेगळं रुप बघायला मिळतं. दूरदूरपर्यंत पसरलेली वाळू तुम्हाला पार्टनरसोबत मस्ती करायला भाग पाडते. तर समुद्राच्या संथ लाटांवर पडणारी सूर्यकिरणे डोळ्यांना वेगळाच आनंद देऊन जातात.
आयर्लॅंडमध्ये सगळीकडे फक्त प्रेमच प्रेम बघायला मिळतं. कुठे उंचच उंच दगडांवर कपल्स त्यांची नावे लिहितात तर कुठे कपल्स इथेच तयार झालेल्या टायटॅनिकला आठवून आपल्या अमर प्रेमाच्या शपथा घेतात. टायटॅनिकचं निर्माण उत्तर आयलॅंडमध्ये झालं होतं. त्यासोबतच येथील संगीतही लोकांच्या मनात घर करुन जातं.
असे सांगितले जाते की, संगीताला कोणती भाषा नसते. ते कोणत्याही रुपात असो मनाला भिडतं. असंच आहे आयर्लॅंडचं पारंपारिक सेल्टिक म्युझिक'. या संगीतातून जीवनाची कहाणी आपल्या वेगळ्या अंदाजातून सांगितली जाते. यात जीवनाच्या वेगवेगळ्या गोष्टी संगीताच्या माध्यमातून हृदयापर्यंत पोहोचवल्या जातात. त्यासोबतच येथील पदार्थही फार प्रसिद्ध आहेत.