शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

हिमाचल प्रदेशातील 'खजियार' ठरतं बेस्ट ऑफबीट डेस्टिनेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 2:43 PM

हिमाचल प्रदेश नेहमीच पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करत असतं. येथील निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी अनेक देशी-विदेशी पर्यटक येथे येत असतात. येथे अनेक फेमस टूरिस्ट स्पॉट्स आहेत.

(Image Credit : thrillophilia.com)

जर तुम्ही फिरण्याचा प्लॅन करत असाल आणि एखाद्या ऑफबीट डेस्टिनेशनच्या शोधात असाल तर आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करू शकतो. हिमाचल प्रदेश नेहमीच पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करत असतं. येथील निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी अनेक देशी-विदेशी पर्यटक येथे येत असतात. येथे अनेक फेमस टूरिस्ट स्पॉट्स आहेत. परंतु, जर तुम्हाला गर्दीपासून दूर जाऊन शांत ठिकाणी निसर्गसौंदर्याचा आनंद घ्यायचा असेल तर यासाठी या राज्यातील खजियारला तुम्ही भेट देऊ शकता.

(Image Credit : HolidayIQ)

तुम्हाला देशातच विदेशी पर्यटन स्थळांची सफर अनुभवायची असेल तर तुम्ही हिमाचल प्रदेशमधील 'खजियार'ला भेट देऊ शकता. कारण खजियारला 'मिनी स्वित्झर्लन्ड' म्हणून ओळखलं जातं. जगभरातील 160 'मिनी स्वित्झर्लन्ड' पैकी एक असलेलं खजियार आपल्या अलौकीक निसर्गसौंदर्यासाठी ओळखलं जातं. 

(Image Credit : trell.co)

खजियार तलाव हिमाचल प्रदेशमधील चंबा जिल्ह्यामध्ये सुमद्र सपाटीपासून 1,920 मीटर उंचावर आहे. याच्या चारही बाजूंना असलेल्या देवनार वृक्षांची तलावाच्या निळ्याशार पाण्यामध्ये अत्यंत सुंदर प्रतिमा उमटते. ते दृश्य अप्रतिम दिसतं. येथील सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे, तलावामध्ये तरंगणारा गवताचा गुच्छ. निळ्याशार पाण्यामध्ये तरंगणारा हा गुच्छ पाहायला फार सुंदर दिसतो. खजियारमद्ये गेल्यानंतर तेथील निसर्गसौंदर्य पाहून तुम्हाला खरचं स्वित्झर्लंडमध्ये गेल्याचा आनंद होईल. 

(Image Credit : traveltriangle.com)

'मिनी स्वित्झर्लन्ड' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खजियारमध्ये तुम्ही अॅडव्हेचरही करू शकता. येथे तुम्ही पॅराग्लायडिंगपासून ते हॉर्स रायडिंगपर्यंत अनेक वेगवेगळ्या अॅक्टिव्हिटी करू शकता. एवढचं नव्हेतर खजियारमध्ये तुम्ही ट्रेकिंगचाही अनुभव घेऊ शकता. खजियार तलावाच्या किनाऱ्यावर एक नागदेवताचं मंदिरही आहे. खजियारमध्ये राहण्यासाठी अनेक गेस्ट हाउसही आहेत. येथे तुमच्या राहण्याची उत्तम सोय होऊ शकते. 

(Image Credit : Pexels)

कसे पोहोचाल? खजियार चंबा किंवा डलहौसीपासून फक्त अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे. खजियारला पोहोचण्यासाठी तुम्ही शिमलापर्यंत रेल्वे मार्गाने किंवा फ्लाइटने जाऊ शकता. यानंतर तुम्हाला बस किंवा टॅक्सी घेऊन खजियारपर्यंत पोहोचता येईल. याव्यतिरिक्त खजियारसोबतच हिमाचल प्रदेशातील इतरही अनेक निसर्गसौंदर्याचा खजाना असलेल्या ठिकाणांना भेट देऊ शकता. त्यामुळे जर तुम्ही हिमाचल प्रदेशात जाणार असाल तर खजियारला नक्की भेट द्या. 

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेशTravel Tipsट्रॅव्हल टिप्सtourismपर्यटन