अद्भूत सौंदर्य, शांत वातावरण... यांचा उत्तम संगम आहे 'हे' डेस्टिनेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 02:58 PM2019-10-10T14:58:46+5:302019-10-10T14:59:29+5:30

हिवाळ्यामध्ये तुम्हीही एखादी ट्रिप करून यायचा विचार करताय आणि एखाद्या हटके ठिकाणाच्या शोधात आहात? मग अजिबातच टेन्शन नका घेऊ. नेहमीच्याच ऑप्शन्सऐवजी तुम्हाला थोडासा हटके ऑप्शन सुचवून तुमची मदत करू शकतो.

Kalimpong is a must visit place for amazing views and peace | अद्भूत सौंदर्य, शांत वातावरण... यांचा उत्तम संगम आहे 'हे' डेस्टिनेशन

अद्भूत सौंदर्य, शांत वातावरण... यांचा उत्तम संगम आहे 'हे' डेस्टिनेशन

googlenewsNext

(Image Credit : flickr.com)

हिवाळ्यामध्ये तुम्हीही एखादी ट्रिप करून यायचा विचार करताय आणि एखाद्या हटके ठिकाणाच्या शोधात आहात? मग अजिबातच टेन्शन नका घेऊ. नेहमीच्याच ऑप्शन्सऐवजी तुम्हाला थोडासा हटके ऑप्शन सुचवून तुमची मदत करू शकतो. दररोजच्या धावपळीपासून दूर आणि शांत ठिकाणी जाण्याचा विचार करत असाल तर, आज आम्ही तुम्हाला अशाच एका सुंदर आणि क्लासी ठिकाणाबाबत सांगणार आहोत. येथे तुम्ही निसर्गसौंदर्यासोबतच अॅडव्हेंचर्सचाही आनंद घेऊ शकता. 

समुद्र सपाटीपासून जवळपास 1250 मीटर उंचावर वसलेलं कलिम्पोंग भारतातील उत्तम ठिकाणांपैकी एक आहे. दार्जिलिंगपासून कलिम्पोंग साधारणतः 51 किलोमीटर अंतरावर असून सिलिगुडीपासून 70 किलोमीटर अंतरावर आहे. हिवाळ्यात फिरण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. 

कलिम्पोंग उत्तम ठिकाण 

कलिम्पोंगमधील निसर्गसौंदर्यासोबतच येथील वातावरणही मन प्रसन्न करण्यासाठी मदत करतं. येथे येण्या-जाण्याच्या रस्त्यामधून प्रवासादरम्यानचं तुम्ही निसर्गसौंदर्य न्याहाळू शकता. येथील हिरवी शाल पांघरलेल्या डोंगरांवरून उगवणाऱ्या सुर्याचं दर्शन घेण्यासोबतच आणि मावळत्या सुर्याला निरोप देण्याचा अनुभव फार सुखद असतो. तसेच या ठिकाणापासून अगदी काही अंतरावर असलेल्या सिलिगुडीलाही तुम्ही भेट देऊ शकता. 

कलिम्पोंगमधील वातावरण बऱ्याचदा थंड असतं. तसेच येथे उन्हाळ्यातही थंड वातावरण असतं. मार्च महिन्यापासून ते मे महिन्यापर्यंत येथील तापमान जवळपास 15 ते 25 डिग्री सेल्सिअसपर्यंत असतं. 

विसरू शकणार नाही अशी ट्रिप 

सिलिगुडी ते कलिम्पोंगपर्यंतचा प्रवास तुम्ही कधीच विसरू शकणार नाही. या प्रवासादरम्यान तीस्‍ता नदीचं सौंदर्य मनाचा ठाव घेतं. 

शॉपिंगसाठी बेस्ट आहे कलिम्पोंग

खास गोष्ट म्हणजे, कलिम्पोंगमध्ये भारतीय सामानाव्यतिरिक्त भूटान, सिक्किम, तिबेट आणि नेपाळ येथील गोष्टी तुम्हाला सहज मिळतील. त्यामुळे अनेक पर्यटक येथे शॉपिंग करत असतात. 

बौद्ध धर्माचं धार्मिक केंद्र 

कलिम्पोंग नेपाळमधील लोकांसाठी घराप्रमाणे आहे आणि हे बौद्ध धर्माचं धार्मिक केंद्र म्हणून ओळखलं जातं. येथील सर्वात पहिल्या बौद्धिस्‍ट मॉनेस्‍ट्रीचं नाव Thongsha Gumpa असं आहे. 

Gladioli फुलासाठी ओळखलं जातं  

कलिम्पोंगमधील Gladioli फुल फार प्रसिद्ध असून येथे मोठ्या प्रमाणावर या फुलांचं उत्पादन करण्यात येतं. तसेच हे जगभरातील वेगवेगळ्या भागांमध्ये एक्सपोर्ट होतात. 

हिवाळा ठरतो बेस्ट 

हिवाळा सुरू होताच म्हणजेच, ऑक्टोबरमध्ये येथे एक फ्लॉवर शो आयोजित केला जातो. स्‍प्रिंग सीजनमध्ये येथे जाणं म्हणजे, तुमच्यासाठी हटके गोष्टींची मेजवाणीच असते. 

Web Title: Kalimpong is a must visit place for amazing views and peace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.