IRCTCची स्पेशल ऑफर; दिल्लीपासून दक्षिण भारत फिरण्याची सुवर्णसंधी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2019 16:26 IST2019-01-02T16:25:32+5:302019-01-02T16:26:23+5:30
IRCTC टूरिज्म 7 दिवस आणि 6 रात्रींसाठी एक स्वस्तात मस्त टूर पॅकेज ऑफर करत आहे. ज्यामध्ये तुम्ही दक्षिण भारतातील 6 शहर एकत्र फिरू शकता.

IRCTCची स्पेशल ऑफर; दिल्लीपासून दक्षिण भारत फिरण्याची सुवर्णसंधी!
IRCTC टूरिज्म 7 दिवस आणि 6 रात्रींसाठी एक स्वस्तात मस्त टूर पॅकेज ऑफर करत आहे. ज्यामध्ये तुम्ही दक्षिण भारतातील 6 शहर एकत्र फिरू शकता. या टूर पॅकेजमध्ये तुम्ही चेन्नई, तिरुपती, तिरुवनंतपुरुम, कन्याकुमारी, रामेश्वरम आणि मदुराई यांसारख्या शहरांना भेट देऊ शकता. या पॅकेजचे नाव साउथ इंडिया डिवाइन टूर पॅकेज असं ठेवलं असून याची सर्वात मोठी खासियत म्हणजे, याची सुरुवाच दिल्लीपासून होणार आहे.
The charm of South India can be best defined through IRCTC which offers "South India Divine Tour" Air Package Ex Delhi in just Rs. 37,540 PP covering Trivandrum, Kanyakumari, Rameshwaram, Madurai & Tirupati in 7 Days. For details, visit https://t.co/GcqBQEc6G4pic.twitter.com/xTxUoVR9Cz
— IRCTC (@IRCTCofficial) December 30, 2018
1 मार्चपासून सुरू होणार आहे टूर
साउथ स्पेशल टूरमध्ये एकूण 30 सीट्स अवेलेबल असतात आणि टूर सुरू होण्याच्या तारखांबाबत बोलायचे झाले तर मार्च 2019मध्ये चार तारखांसाठी आहे. ज्यामध्ये 1 मार्च, 12 मार्च, 19 मार्च आणि 24 मार्च या तारखांचा समावेश आहे. त्याचबरोबर या टूरमध्ये फ्लाइटने येण्याजाण्याचा खर्च, सर्व शहरांमध्ये स्टँडर्ड हॉटेल्समध्ये राहणं, ब्रेकफास्ट आणि डिनर, साइटसीइंग आणि टूर पॅकेजमध्ये सामविष्ट असलेल्या सर्व शहरांमधील प्रसिद्ध ठिकाणांचा समावेश आहे.
6 शहरांमध्ये फिरण्याची संधी
जर तुम्ही आतापर्यंत साउथ इंडियाच्या प्रसिद्ध मंदिरांना भेट दिली नसेल तर तुमच्यासाठी ही टूर उत्तम पर्याय आहे. IRCTC ने दिलेलं हे स्पेशल टूर पॅकेज तुम्हाला केरळच्या प्रसिद्ध पद्मनाभस्वामी मंदिर, कन्याकुमारीचे प्रसिद्ध विवेकानंद रॉक मेमोरियल, रामानाथस्वामी मंदिर यांच्यासमवेत तिरूपतीमधील प्रसिद्ध बालाजी मंदिरालाही भेट देता येईल.
36 हजार रूपये प्रति व्यक्ती पॅकेजची किंमत
टूर पॅकेजच्या किंमतीबाबत बोलायचे झाले तर ट्रिपल ऑक्यूपेंसी म्हणजेच जर 3 व्यक्ती एकत्र येऊन ही टूर बुक करत असतील तर प्रति व्यक्ती 36 हजार 650 रुपये मोजावे लागतील. डबल ऑक्यूपेंसी म्हणजेच 2 लोकांसोबत ही टूर बुक करत असाल तर प्रति व्यक्ति 37 हजार 540 रुपये आणि जर तुम्ही एकटेच जाणार असाल तर टूर पॅकेजची किंमत प्रति व्यक्ति 48 हजार रुपये असेल.