अवघ्या 15 हजारात गुजरात फिरण्याची संधी, जाणून घ्या कसे करायचे बुकिंग?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 08:47 AM2023-07-10T08:47:15+5:302023-07-10T08:47:55+5:30

IRCTC Tour Package : आयआरसीटीसीच्या या टूर पॅकेजला केवडिया विथ अहमदाबाद एक्स मुंबई ( Kewadia With Ahmedabad Ex Mumbai) असे नाव देण्यात आले आहे.

irctc tour package kewadia with ahmedabad vadodara statue of unity starts from rs 15440 per person | अवघ्या 15 हजारात गुजरात फिरण्याची संधी, जाणून घ्या कसे करायचे बुकिंग?

अवघ्या 15 हजारात गुजरात फिरण्याची संधी, जाणून घ्या कसे करायचे बुकिंग?

googlenewsNext

अनेक जणांना भटकंतीची आवड असते. तुम्हालाही भटकंतीची आवड असेल तर तुमच्यासाठी एक संधी आहे. दरम्यान, आयआरसीटीसी ( IRCTC) तुमच्यासाठी असे टूर पॅकेज घेऊन आले आहे, ज्यामध्ये तुम्ही अगदी कमी खर्चात गुजरातमध्ये फिरू शकता. या पॅकेजमधील विशेष आणि इतर महत्त्वाचे डिटेल्स आहेत ते जाणून घ्या... 

आयआरसीटीसीच्या या टूर पॅकेजला केवडिया विथ अहमदाबाद एक्स मुंबई ( Kewadia With Ahmedabad Ex Mumbai) असे नाव देण्यात आले आहे. हे टूर पॅकेज 4 दिवस आणि 3 रात्रीचे असणर आहे. या पॅकेजचा लाभ तुम्ही दर शुक्रवारी मुंबईतून घेऊ शकणार आहात.

या मिळतील सुविधा
- येण्या-जाण्याच्या तिकिटाची सुविधा मिळेल.
- टूर पॅकेजमध्ये ब्रेकफास्ट आणि डिनरचा समावेश असणार आहे.
- हॉटेलमध्ये राहण्याची सर्व व्यवस्था IRCTC कडून केली जाईल.
- यामध्ये ट्रॅव्हल इन्शुरन्सचाही समावेश असणार आहे.
- एसी वाहनाने प्रवास करण्याची सुविधा असणारआ हे.

IRCTC ने ट्विटद्वारे दिली माहिती
आयआरसीटीसीने या टूर पॅकेजची माहिती देणारे ट्विट शेअर केले आहे. ज्यामध्ये तुम्हाला गुजरातचे सौंदर्य जवळून पाहायचे असेल, तर तुम्ही आयआरसीटीच्या या अप्रतिम टूर पॅकेजचा लाभ घेऊ शकता.

असे करू शकता बुकिंग
तुम्ही या टूर पॅकेजसाठी आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाइटवरून बुक करू शकता. याशिवाय, आयआरसीटीसी पर्यटक सुविधा केंद्र, क्षेत्रीय कार्यालये आणि प्रादेशिक कार्यालयांमधूनही बुकिंग करता येते. पॅकेजशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही आयआरसीटीसी अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.

Web Title: irctc tour package kewadia with ahmedabad vadodara statue of unity starts from rs 15440 per person

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.