सोलो ट्रिपला जाणार असाल तर 'या' गोष्टींची घ्या काळजी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2019 12:08 IST2019-03-25T11:56:32+5:302019-03-25T12:08:05+5:30
सोलो ट्रिपवर जाणं हा फारच रोमांचक आणि वेगळा अनुभव असतो. यात तुम्ही एखादं ठिकाण फिरत असताना स्वत:लाही नव्याने शोधत असता.

सोलो ट्रिपला जाणार असाल तर 'या' गोष्टींची घ्या काळजी!
(Image Credit : Rough Guides)
सोलो ट्रिपवर जाणं हा फारच रोमांचक आणि वेगळा अनुभव असतो. यात तुम्ही एखादं ठिकाण फिरत असताना स्वत:लाही नव्याने शोधत असता. ही स्वत:सोबत वेळ घालवण्याची आणि स्वत:ला आणखी जाणून घेण्याची सर्वात चांगली संधी असते. अशात ही तुमची सोलो ट्रिप अविस्मरणिय करण्यासाठी ट्रिपला जाण्याआधी काही गोष्टींची खास काळजी घ्यावी लागते. तेव्हाच ही ट्रिप अविस्मरणिय ठरेल किंवा तुम्ही पूर्णपणे एन्जॉय करू शकाल.
योग्य डेस्टिनेशन ठरवा
सोलो ट्रिपला जाण्याआधी योग्य डेस्टिनेशन निवडणं फार गरजेचं असतं. अशावेळी कुणी काय सांगितलं, याचा विचार न करता तुम्हाला वाटतं त्या ठिकाणाची निवड करा. पण ते ठिकाण सोलो ट्रिपसाठी किती परफेक्ट आहे हे सुद्धा चेक करा.
हॉटेल बुकिंग
तिथे जाण्याआधी तिथे थांबण्यासाठी काय व्यवस्था आहे हे बघा. शक्य असेल तर आधीच बुकिंग करा. म्हणजे तुम्ही पोहोचल्यावर तुम्हाला उगाच जागा शोधत फिरावं लागणार नाही. आधीच ठरलेलं असेल तर तुम्हाला फिरण्यासाठी अधिक वेळ मिळेल.
लाइट पॅकिंग
सोलो ट्रिपमध्ये सर्वात गरजेचं आहे तुमचं पॅकिंग. सोलो ट्रिपला जाताना सोबत कमीच ओझं असावं. कपडे निवडतानाही डेस्टिनेशननुसार कपडे निवडा जेणेकरून या ट्रिपचा आनंद वेगळ्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकाल.
कनेक्टेड रहा
प्रयत्न करा की, तुम्ही कुठे जाताय, कुठे थांबताय, हे सगळं घरातील सदस्यांना किंवा मित्रांना सांगून ठेवा. जेणेकरून वेळेवर काहीही अडचण आली तर तुम्ही त्यांच्यांशी कनेक्ट होऊ शकाल.
रोमांचक गोष्टी करा
सोलो ट्रिपचा अर्थ हा नाही की, कुठेतरी एकटं बसून लोकांना एन्जॉय करताना बघायचं. तुम्ही ट्रेकिंग, वेगवेगळे स्पोर्ट्स करू शकता. रिव्हर राफ्टींग करायचं असेल तर तेही करा.
एकटं जेवायला लाजू नका
अनेकदा असं होतं की, आपण डायनिंग टेबलवर मित्रांसोबत किंवा फॅमिलीसोबत बसतो. पण एकट्याने असं बसून खाणं कुणालाही विचित्र वाटेल. पण असं विचित्र काही वाटू देऊ नका. तुम्ही एन्जॉय करण्यासाठी आले आहात तर पूर्णपणे एन्जॉय करा.
किंमती वस्तूंची सुरक्षा
सोलो ट्रिपला जाताना तुम्ही तुमच्या किंमती वस्तू नेणं टाळा. ज्या वस्तू सोबत नेत आहात त्यांची काळजी घ्या. कारण तुम्हाला एकटं पाहून तुमच्याकडून वस्तू चोरीही केल्या जाऊ शकतात.
बिनधास्त रहा
अनेकदा अशावेळी आपण लोकांशी बोलणं टाळतो. तुम्ही लिफ्ट मागूनही प्रवास करू शकता. फक्त योग्य व्यक्तीकडूनच लिफ्ट घ्या. याने तुम्ही लोकांशी जोडले जाल आणि तुमचे पैसेही वाचतील.