नुकतच लग्न झालेल्यांसाठी खुशखबर! फक्त १२ हजारात जबरदस्त हनीमुन पॅकेज
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2019 17:12 IST2019-12-07T12:39:21+5:302019-12-07T17:12:44+5:30
हिवाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. सण-उत्सवांचा सिजन संपून आता लग्नाचा सीजन सुरू झाला आहे.

नुकतच लग्न झालेल्यांसाठी खुशखबर! फक्त १२ हजारात जबरदस्त हनीमुन पॅकेज
(Image credit- Tour travel world)
हिवाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. सण-उत्सवांचा सिजन संपून आता लग्नाचा सीजन सुरू झाला आहे. तसचं गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी आता सगळ्याच्या घरी फिरायला जायच्या चर्चा चालल्या आहेत. काही कपल्स हे रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून वेळ काढून कुठे थंडीची मजा घेण्यासाठी फिरायला जायचं अशा विचारात रममाण झाले आहेत. तुम्ही सुध्दा जर फिरायला जायचा विचार करत असाल तर एक खुशखबर आम्ही तुम्हाला देणार आहोत. आयआरसीटीसीने नुकतेच लग्न झालेल्या जोडप्यांसाठी खास हनीमुन टूर पॅकेज उपलब्ध करून दिले आहे. चला तर मग जाणून घेऊया कसं आहे हे खास हनीमुन पॅकेज.
आयआरसीटीसीने काढलेल्या या हनीमून पॅकेज मध्ये नवविवाहीत जोडपी ही केरळच्या निसर्ग सौंदर्याचां आनंद घेऊ शकतात. या पॅकेजचे नाव केरल हनीमुन पॅकज असे आहे. या पॅकेज अंतर्गत केरळ मधील कोच्चि, मुन्नार आणि अलेप्पी ही ठिकाणी पर्यटनाचा आनंद घेता येणार आहे.
साधारपणे हि ट्रीप सहा दिवस आणि पाच रात्रींची आहे. तसेच या पॅकेजमध्ये रेल्वेचं तिकीट आणि हॉटेलच्या एसी रुम मध्ये राहण्याची सोय एव्हढेच नाही तर त्याठिकाणी गेल्यानंतर एसी बस सेवा, नाष्ता या सोयीसुविधा देण्यात आल्या आहेत. हा प्रवास सिकंदराबाद येथून सुरू होईल.
या निसर्गरम्य ठिकाणी जर तुम्हाला जायचं असेल तर थर्ड एसीसाठी तुम्हाला १४ हजार ४६० रुपये द्यावे लागणार आहेत. स्लीपर कोचमधून प्रवास करणं जास्त फायदेशीर ठरेल. कारण स्लीपर कोचने प्रवास करायचा असल्यास ११ हजार ७९० रुपये दोन व्यक्तींसाठी दयावे लागणार आहेत.