संस्कृतीचं अप्रतिम दर्शन घडवणारं लडाखमधील 'हेमिस फेस्टिव्हल'
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2019 15:57 IST2019-07-13T15:56:18+5:302019-07-13T15:57:57+5:30
लेह-लडाख म्हणजे, पृथ्वीवरील स्वर्ग... आपल्या सौंदर्यासाठी ओळखलं जाणारं हे ठिकाम येथे होणाऱ्या हेमिस फेस्टिव्हलसाठीही ओळखलं जातं. संपूर्ण जगभरामध्ये या फेस्टिव्हलची चर्चा असते.

संस्कृतीचं अप्रतिम दर्शन घडवणारं लडाखमधील 'हेमिस फेस्टिव्हल'
लेह-लडाख म्हणजे, पृथ्वीवरील स्वर्ग... आपल्या सौंदर्यासाठी ओळखलं जाणारं हे ठिकाम येथे होणाऱ्या हेमिस फेस्टिव्हलसाठीही ओळखलं जातं. संपूर्ण जगभरामध्ये या फेस्टिव्हलची चर्चा असते. एवढचं नाही तर जगभरातून अनेक पर्यटक येथे या फेस्टिव्हलसाठी येत असतात.
लडाख तेथील सौंदर्यासोबतच शांततेसाठीही ओळखलं जातं. फेस्टिवल सुरू असताना हे सुंदर ठिकाणं आणखी रंगीबेरंगी होतं. असं सांगितलं जातं की, लेह-लडाखमध्ये साजरा करण्यात येणारं हेमिस फेस्टिव्हल विश्वासाचा उत्सव म्हणून साजरा करण्यात येतो.
आता जाणून घेऊया की, हेमिस फेस्टिव्हल का साजरा करण्यात येतो. आपल्यापैकी अनेक लोकांना माहीत आहे की, लडाखला मिनी तिबेट म्हटलं जातं. लडाखमध्ये हेमिस फेस्टिव्हलचं इतिहासाशी अत्यंत घनिष्ट संबंध आहे.
गुरू रिन्पोछे पद्मसंभव हे आठव्या शतकातील महान बौद्ध तत्त्वज्ञ होते. येथील स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी काही वाईट प्रवृत्तींना लडाखमधून दूर केलं होतं. त्यामुळे वाईटावर मिळवलेल्या विजयाच्या रूपात हे फेस्टिव्हल साजरं करण्यात येतं.
याच आठवणींमध्ये हेमिस गोंपामध्ये हेमिस फेस्टिव्हल साजरं करण्यात येतं. हे फेस्टिव्हल दोन दिवसांसाठी साजरं करण्यात येतं. या फेस्टिव्हलमध्ये गुरू रिन्पोछे पद्मसंभव यांचे अनुयायी आणि अनेक पर्यटक या फेस्टिव्हलमध्ये सहभागी होतात.
हे फेस्टिव्हल तिबेटी कॅलेंडरनुसार, पाचव्या महिन्यातील दहाव्या दिवशी साजरं करण्यात येतं. हे फेस्टिव्हल पद्मसंभव यांच्या बर्थ अॅनिवर्सरीच्या रूपात साजरं केलं जातं. यावर्षीही हे फेस्टिव्हल 11 आणि 12 जुलै रोजी मोठ्या उत्साहात साजरं करण्यात आलं. या दिवशी सर्व लोकं एकत्र येऊन पारंपारिक नृत्य करतात. तसेच अनेक सांस्कृतिक उपक्रमही राबवण्यात येतात.