'या' मंदिरात मकरसंक्रांतीला होतो चमत्कार, वास्तूरचनकारांच्या कलेचं घडतं अनोखं दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2022 15:37 IST2022-01-16T15:34:30+5:302022-01-16T15:37:37+5:30
बंगलोर मध्ये असलेले एक शिवमंदिर असेच वर्षातून एकदा दिसणाऱ्या अद्भुत नजाऱ्या मुळे चर्चेत असते. मात्र येथे चमत्कार घडत नाही तर आपले पूर्वीचे वास्तूरचनाकार किती ज्ञानी होते, त्यांचा नक्षत्र अभ्यास किती खोल होता याची प्रचीती येथे दरवर्षी मकर संक्रांतिच्या दिवशी येते.

'या' मंदिरात मकरसंक्रांतीला होतो चमत्कार, वास्तूरचनकारांच्या कलेचं घडतं अनोखं दर्शन
भारतात हजारोंच्या संख्येने शिवमंदिरे आहेत आणि त्यातील काही मंदिरात घडण्याऱ्या अद्भुत घटनांमुळे अशी मंदिरे भाविकांची श्रद्धास्थाने बनली आहेत. अनेक मंदिरात घडणाऱ्या चमत्काराचे रहस्य आजही उलगडलेले नाही. बंगलोर मध्ये असलेले एक शिवमंदिर असेच वर्षातून एकदा दिसणाऱ्या अद्भुत नजाऱ्या मुळे चर्चेत असते. मात्र येथे चमत्कार घडत नाही तर आपले पूर्वीचे वास्तूरचनाकार किती ज्ञानी होते, त्यांचा नक्षत्र अभ्यास किती खोल होता याची प्रचीती येथे दरवर्षी मकर संक्रांतिच्या दिवशी येते.
बंगलोर मधील गवी गंगाधरेश्वर मंदिर असे या मंदिराचे नाव आहे. ९ व्या शतकात कॅम्पे गौडा यांनी हे मंदिर बांधले आणि १६ व्या शतकात त्याचा जिर्णोद्धार केला गेला आहे. या मंदिरातील शिवलिंग स्वयंभू आहे. मकरसंक्रांति दिवशी या शिवलिंगावर सूर्यदेव त्यांच्या किरणांनी अभिषेक करतो. पूर्ण वर्षात फक्त एकच दिवस हे दृश्य दिसते. मकरसंक्रांतिला सूर्याचे उत्तरायण सुरु होते त्या दिवशी सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी ५ ते ७ मिनिटे सूर्यकिरणे मंदिराच्या गर्भगृहात शिवपिंडीवर पडतात. हे दृश्य पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होते.
मंदिर बांधताना विचार करून केलेली वास्तू रचना यामुळे हा चमत्कार घडतो. हे मंदिर नैऋत्य कोनात बांधले गेले असून वर्षातून फक्त या एकाच दिवशी सूर्यकिरणे गाभाऱ्यात येतील अश्या प्रकारे मंदिराची रचना केली गेली आहे. या मंदिराचे अन्य एका वैशिष्ट म्हणजे येथे पिंडीवर तूप घातले तर त्याचे लोण्यात रुपांतर होते. वास्तविक आपण लोण्यापासून तूप बनवितो पण तेथे नेमका उलटा प्रकार घडतो. या मागचे रहस्य अजून उलगडलेले नाही.