शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

सुर्योदय अनुभवण्यासाठी देशातील 'या' सनराइज पॉइंट्सना नक्की भेट द्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2018 1:23 PM

हिवाळ्यामध्ये अनेक जण सुट्टी घेऊन बाहेर फिरून येण्याचा विचार करतात. या मागील उद्देश म्हणजे आपल्या व्यस्त दिनचर्येतून थोडासा वेळ काढून स्वतःला वेळ द्यावा हाच असतो.

हिवाळ्यामध्ये अनेक जण सुट्टी घेऊन बाहेर फिरून येण्याचा विचार करतात. या मागील उद्देश म्हणजे आपल्या व्यस्त दिनचर्येतून थोडासा वेळ काढून स्वतःला वेळ द्यावा हाच असतो. जर तुम्हीही असाच काहीसा प्लॅन करण्याच्या विचारात असाल तर आम्ही तुम्हाला काही बेस्ट डेस्टिनेशन्स सांगणार आहोत. सध्या अनेक मंडळी फिरण्यासाठी सतत विदेशी जाण्याच्या विचारात असतात. यामध्ये वेळही वाया जातो आणि बजेटही थोडं वाढतं. त्याऐवजी आपल्या भारतातच अनेक अशी ठिकाण आहेत जी विदेशातील ठिकाणांची आठवणही येऊ देणार नाहीत. या ठिकाणांना निसर्गाने जणू वरदानच दिलं आहे. जाणून घेऊयात भारतातील सनराइज पॉइन्ट्सबाबत...

टाइगर हिल, दार्जिलिंग 

पश्चिम बंगालमधील दार्जिलिंगमध्ये असलेलें टायगर हिल सनराइज पाहण्यासाठी फार सुंदर ठिकाण आहे. देशा-विदेशातून अनेक पर्यटक येथे निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी येत असतात. येथे जेवढे पर्यटक येतात ते टायगर हिलवर सुर्योदय पाहण्यासाठी नक्की जातात. तुम्ही दार्जिलिंगच्या आधी असलेल्या घूम स्टेशनवरून चालत किंवा गाडीने टायगर हिलपर्यंत जाऊ शकता. टायगर हिलपासून कंचनजंगा आणि माउंट एवरेस्टचं सुंदर दृश्य न्याहाळता येतं. 

नंदी हिल्स, कर्नाटक 

दक्षिण भारतातील नंदी टाउनजवळ असलेलं नंदी हिल्स तुम्हाला शहरातील धवपळीपासून थोडासा आराम देऊन वेगळ्या जगाची सफर घडवेल. येथाल जुनी मंदिरं आणि डोंगर दऱ्यांमध्ये तुम्ही हरवल्याशिवाय राहणार नाही. हलक्या धुक्यामधून हळूहळू होणारा सुर्योदय आणि त्याचसोबत आकाशामध्ये पसरणाऱ्या रंगछटा तुमचं मन प्रसन्न करतील. 

कोवलम बीच, केरळ

'गॉड्स ओन कंट्री' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केरळची ख्याती तर संपूर्ण जगभरात पसरली आहे. निसर्गाचं वरदान लाभलेल्या केरळमध्ये सुर्योदय पाहणं म्हणजे निसर्गाची किमयाच आहे. केरळातील कोवलम बीच आपल्या नैसर्गसौंदर्यासोबतच अरबी समुद्राच्या निळ्याशार पाण्यासाठीही प्रसिद्ध आहे. 

कन्याकुमारी, तमिलनाडु 

भारताच्या दक्षिणेकडील सर्वात शेवटचं टोक म्हणजे कन्याकुमारीची खासियत.  येथे सनराइज पाहणं म्हणजे मन प्रसन्न करणारा अनुभव. हे ठिकाण सुर्योदय आणि सुर्यास्त पाहण्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशन आहे. कन्याकुमारी म्हणजे हिंद महासागर, अरबी समुद्र आणि बंगालची खाडी या तिघांचाही मिटिंग पॉइंट म्हणूनही ओळखला जातो. 

उमियम लेक, मेघालय 

भारताच्या उत्तरेला असलेला हा तलाव अनेक पर्यटकांचं आकर्षणाचं केंद्र आहे. येथील अद्भुत करणारं सौंदर्य भारतातील नव्हे तर विदेशातील पर्यटकांनाही आपली दखल घेण्यास भाग पाडतं. हा तलाव शिलॉन्गपासून 15 किलोमीटर अंतरावर आहे. तुम्ही शिलॉन्गवरून गाडी बुक करून सकाळी येथे जाऊ शकता. 

टॅग्स :tourismपर्यटनKeralaकेरळTamilnaduतामिळनाडूKarnatakकर्नाटक