Mahashivratri Special Tour Package : महाशिवरात्रीसाठी खास टूर पॅकेज, कमी खर्चात करा ९ ज्योतिर्लिंगांचे दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2020 17:11 IST2020-02-17T17:04:20+5:302020-02-17T17:11:08+5:30
IRCTC Tour Package : महाशिरात्रीसाठी आयआरसीटीचे खास पॅकेज. २१ फेब्रुवारीला महाशिवरात्र आहे. १९ तारखेला हे टूर पॅकेज सुरू होणार आहे. तुम्ही या टूर पॅकेजचा आनंद घेऊन देवदर्शन करू शकता.

Mahashivratri Special Tour Package : महाशिवरात्रीसाठी खास टूर पॅकेज, कमी खर्चात करा ९ ज्योतिर्लिंगांचे दर्शन
येत्या २१ फेब्रवारीला महाशिवरात्र आहे. या दिवशी सगळेच महादेवाचे उपासक उपवास आणि पुजाअर्चा करून देवाप्रती आपल्या भावना व्यक्त करत असतात. महाशिवरात्रीचे औचित्य साधून इंडियन रेल्वे कॅटरिंग एंड टूरिज्म कॉरपोरेशन (IRCTC) कडून एक खास टूर पॅकेज तयार करण्यात आलं आहे. या टूर पॅकेजमध्ये तुम्हाला ९ ज्योर्तिलिंगाचे दर्शन करायला मिळणार आहे.
१२ रात्र आणि १३ दिवसांच हे पॅकेज असणार आहे. या टूर पॅकेजचं नाव महाशिवरात्री नऊ ज्योतिर्लिंग यात्रा असं आहे. या पॅकेजची सुरूवात तामिळनाडूच्या तिरुनेलवेल्लीवरून १९ फेब्रुवारीला होणार आहे.
(image credit-ixigo)
या टूरपॅकेजमध्ये महादेवाचे ९ ज्योतिर्लिंगं तुम्हाला पाहता येणार आहेत. यात मध्यप्रदेशातील उज्जैनमधिल महाकालेश्वर, गुजरातमधिल सोमनाथ, महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, गृश्नेश्वर, औंधा नागनाथ, पर्ली वैजनाथ आणि तेलंगानातील मल्लिकार्जुन स्वामींचे मंदिर या ठिकाणी फिरता येणार आहे. ( हे पण वाचा-तब्बल २ हजार वर्ष जुन्या किल्ल्यात दडलेेले रहस्य माहीत आहे का?)
(image credit-buisness today)
या टूरपॅकेज मध्ये ट्रेनने येण्याजाण्याचा खर्च, राहण्याचा, सकाळचा चहा, कॉफी, ब्रेकफास्ट, दोन्ही वेळचे खाणं-पिणं यांचा समावेश आहे. या टूर पॅकेजमध्ये भारतदर्शनासाठी टुरिस्ट ट्रेन असणार आहे. या टूर पॅकेजसाठी १५ हजार तीनशे वीस रूपये द्यावे लागणार आहेत. तुम्ही रेल्वे स्थानकातून किंवा आयआरसीटीसीच्या वेबसाईवरून या पॅकेजची बुकिंग करू शकता. ( हे पण वाचा-कधीही न पाहिलेली जगातील सगळ्यात मोठी गुहा पाहून डोळे उघडेच राहतील!)