भारत विविधतेने नटलेला देश आहे. भाषा, रूढी-परंपरा, खाद्यपदार्थ, संस्कृती यांमध्ये विविधता आढळून येते. प्रत्येक राज्य आणि त्यांतील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळी संस्कृती आढळून येते. एवढेच नव्हे तर भारतात साजऱ्या होणाऱ्या सणांमध्येही विविधता आढळून येते. असं असलं तरिही प्रत्येक सण सगळे एकत्र येऊन साजरा करतात. येत्या सप्टेंबर महिन्यामध्ये अनेक सण आणि फेस्टिव्हल्स एकत्र येत आहेत. जाणून घेऊयात त्या सणांबाबत आणि ते ज्या ठिकाणी साजरे होतात त्या ठिकाणांबाबत...
1. कृष्ण जन्माष्टमी
![]() सप्टेंबर महिन्याची सुरुवातच हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण कृष्ण जन्माष्टमीने होत आहे. संपूर्ण देशभरात कृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. मथुरा-वृंदावनसारख्या शहरांमध्ये कृष्ण भक्तांची रिघ लागलेली असते. तर मुंबईमध्ये कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दही हंडी फोडण्याच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. एकावर एक उभं राहत मनोरे रचले जातात आणि उंचावर बांधलेली दहीहांडी फोडण्यात येते.
सप्टेंबर महिन्याची सुरुवातच हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण कृष्ण जन्माष्टमीने होत आहे. संपूर्ण देशभरात कृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. मथुरा-वृंदावनसारख्या शहरांमध्ये कृष्ण भक्तांची रिघ लागलेली असते. तर मुंबईमध्ये कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दही हंडी फोडण्याच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. एकावर एक उभं राहत मनोरे रचले जातात आणि उंचावर बांधलेली दहीहांडी फोडण्यात येते. 
कधी - 2 ते 3 सप्टेंबर 2018
कुठे - हा सण संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो. पण याची खरी धम्माल  मथुरा-वृंदावन आणि मुंबईमध्ये अनुभवता येईल.
2. गोगामेदी फेयर
![]() राजस्थानमध्ये साजरा करण्यात येणारा हा फेस्टिव्हल फार प्राचीन काळापासून साजरा करण्यात येतो. या फेस्टिव्हलमध्ये राजस्थानच्या पारंपारिक हॅन्डीक्राफ्टचं प्रदर्शन भरवण्यात येतं. या फेस्टिव्हलमध्ये सापांची पूजा करण्यात येते. या फेस्टिव्हलची सुरुवात गोगा नवमीच्या दिवशी होते. एकूण तीन दिवस हे फेस्टिव्हल सुरू असते.
राजस्थानमध्ये साजरा करण्यात येणारा हा फेस्टिव्हल फार प्राचीन काळापासून साजरा करण्यात येतो. या फेस्टिव्हलमध्ये राजस्थानच्या पारंपारिक हॅन्डीक्राफ्टचं प्रदर्शन भरवण्यात येतं. या फेस्टिव्हलमध्ये सापांची पूजा करण्यात येते. या फेस्टिव्हलची सुरुवात गोगा नवमीच्या दिवशी होते. एकूण तीन दिवस हे फेस्टिव्हल सुरू असते.
कधी - 4 ते 6 सप्टेंबर 2018
कुठे - गंगानगर, राजस्थान 
3. नीलमपेरूर पाटायनी
![]() जवळपास 16 रात्री चालणारं हे फेस्टिव्हल लोकांच्या श्रद्धेसाठी ओळखलं जातं. यामध्ये रात्रभर लोकसंगीत आणि लोक नृत्यांचे कार्यक्रम करण्यात येतात. असं मानलं जातं की, या 16 रात्रींमध्ये देव-देवता स्वर्गातून पृथ्वीतलावर येतात. रंगीबेरंगी आणि मोठ्या मुर्त्यांसह संपूर्ण शहरात मिरवणूकही काढण्यात येते.
जवळपास 16 रात्री चालणारं हे फेस्टिव्हल लोकांच्या श्रद्धेसाठी ओळखलं जातं. यामध्ये रात्रभर लोकसंगीत आणि लोक नृत्यांचे कार्यक्रम करण्यात येतात. असं मानलं जातं की, या 16 रात्रींमध्ये देव-देवता स्वर्गातून पृथ्वीतलावर येतात. रंगीबेरंगी आणि मोठ्या मुर्त्यांसह संपूर्ण शहरात मिरवणूकही काढण्यात येते. 
कधी - 9 सप्टेंबर
कुठे -  पाली भगवती टेम्पल, एलीपी, केरल
4. अभानेरी फेस्टिवल
![]() हे फेस्टिव्हल राजस्थानातील गावातील पर्यटन वाढविण्यासाठी साजरं करण्यात येतं. या फेस्टिव्हलमध्ये राजस्थानमधील लोकनृत्य आणि लोककला यांचा संगम दिसून येतो.
हे फेस्टिव्हल राजस्थानातील गावातील पर्यटन वाढविण्यासाठी साजरं करण्यात येतं. या फेस्टिव्हलमध्ये राजस्थानमधील लोकनृत्य आणि लोककला यांचा संगम दिसून येतो. 
कधी - 10 ते 13 सप्टेंबर 
कुठे - राजस्थान 
5.  गणेश चतुर्थी
![]() पहायला गेलं तर हा उत्सव संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. परंतु मुंबईमध्ये या उत्सवाची मजा काही औरच असते. वेगवेगळ्या रूपातले आणि उंचीचे गणपती या फेस्टिव्हलमध्ये आपल्याला पाहायला मिळतात.
पहायला गेलं तर हा उत्सव संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. परंतु मुंबईमध्ये या उत्सवाची मजा काही औरच असते. वेगवेगळ्या रूपातले आणि उंचीचे गणपती या फेस्टिव्हलमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 
कधी - 13 ते 23 सप्टेंबर
कुठे - महाराष्ट्र, गोवा, तमिळनाडू, कर्नाटक
6. मोहरम
![]() मुस्लिम समाजामध्ये साजरा करण्यात येणारा हा सण संपूर्ण देशात साजरा करण्यात येतो.  हजरत इमाम हुसैन यांच्या बलिदानासाठी ताजिया म्हणजेच मिरवणूक काढण्यात येते.
मुस्लिम समाजामध्ये साजरा करण्यात येणारा हा सण संपूर्ण देशात साजरा करण्यात येतो.  हजरत इमाम हुसैन यांच्या बलिदानासाठी ताजिया म्हणजेच मिरवणूक काढण्यात येते. 
कधी - 21 सप्टेंबर, 2018
कुठे - उदयपुर, राजस्थानसह संपूर्ण देशात
7. रामनगर रामलीला
![]() ही रामलीला सर्वात जुनी रामलीली म्हणून ओळखली जाते. ही 200 वर्षांपासून सुरू असलेली रामलीला आहे. यामध्ये लोकं हिंदू धर्मातील प्राचीन ग्रंथ म्हणून ओळख असणाऱ्या रामायणातील दृश्य प्रेक्षकांसमोर साजरी करण्यात येतात. रामायणावर आधारित असलेली ही रामलीला दरवर्षी अनंत चथुर्दशीच्या दिवशी रावण वधाने संपवण्यात येते.
ही रामलीला सर्वात जुनी रामलीली म्हणून ओळखली जाते. ही 200 वर्षांपासून सुरू असलेली रामलीला आहे. यामध्ये लोकं हिंदू धर्मातील प्राचीन ग्रंथ म्हणून ओळख असणाऱ्या रामायणातील दृश्य प्रेक्षकांसमोर साजरी करण्यात येतात. रामायणावर आधारित असलेली ही रामलीला दरवर्षी अनंत चथुर्दशीच्या दिवशी रावण वधाने संपवण्यात येते.
कुठे - रामनगर, बनारस 
8. लदाख फेस्टिवल
![]() कश्मिरच्या लदाखमधील या फेस्टिव्हलमध्ये तेथील कला आणि संस्कृतीचं दर्शन घडवलं जातं. देश विदेशातून पर्यटक या फेस्टिव्हलसाठी लदाखमध्ये येतात.
कश्मिरच्या लदाखमधील या फेस्टिव्हलमध्ये तेथील कला आणि संस्कृतीचं दर्शन घडवलं जातं. देश विदेशातून पर्यटक या फेस्टिव्हलसाठी लदाखमध्ये येतात.
कधी - सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात
कुठे - लेह
9. जीरो म्युजिक फेस्टिवल
![]() संपर्ण देशामध्ये हे फेस्टिव्हल पसंत केलं जातं. यामध्ये जगभरातील सर्वात फेमस असे 30 बॅन्ड दरवर्षी परफॉर्म करतात. जगभरातून पर्यटक या फेस्टिव्हलसाठी भारतात येतात.
संपर्ण देशामध्ये हे फेस्टिव्हल पसंत केलं जातं. यामध्ये जगभरातील सर्वात फेमस असे 30 बॅन्ड दरवर्षी परफॉर्म करतात. जगभरातून पर्यटक या फेस्टिव्हलसाठी भारतात येतात.
कधी - 27 ते 30 सप्टेंबर, 2018
कुठे - जीरो वॅली, अरूणाचल प्रदेश