भारतामध्ये अनेक अशी ठिकाणं आहेत, जी आपल्या निसर्गसौंदर्यासाठी ओळखली जातात. येथे जाऊन तुम्हाला प्रसन्न वाटेल. सर्व ताण-तणाव विसरून मूड रिफ्रेश करण्यासाठी ही ठिकाणं मदत करतात. अशातच ठिकाणांपैकी एक ठिकाण म्हणजे, तिरूअनंतरपुरम. जर तुम्ही मान्सूनमध्ये फिरण्यासाठी अशा ठिकाणाच्या शोधात असाल जिथे जाऊन निसर्गाच्या कुशीत रिलॅक्स करू शकता. तर तुमच्यासाठी तिरूअनंतरपुरम उत्तम पर्याय आहे. 

(Image Credit : https://www.holidayiq.com)

जून ते सप्टेंबर दरम्यानचा काळ उत्तम

तिरूअनंतरपुरममधील वातावरणही अगदी प्रसन्न करणारं असतं. त्यामुळे वर्षभरात कोणत्याही महिन्यामध्ये तुम्ही फिरण्यासाठी जाऊ शकता. परंतु, जून ते सप्टेंबरपर्यंतचा काळात येथे जाणं म्हणजे जणू स्वर्ग सुखचं... कारण पावसाळ्यात येथील सौंदर्य आणखी बहरतं. तिरूअनंतरपुरममध्ये फिरण्यासाठी अनेक सुंदर ठिकाणं आहेत. 

(Image Credit : https://nature.desktopnexus.com)

कोवलमचं सौंदर्य तुम्ही कधीच विसरू शकत नाही. येथे तुम्ही सुंदर बीच आणि येथील नारळाच्या झाडांसाठी प्रसिद्ध आहेत. येथील शंकुमुघम बीचवर उगवणाऱ्या सूर्याचं दर्शन घेणं म्हणजे, भाग्यचं... 

कोलवममध्ये लाइटहाउस नावाचा एक सुंदर समुद्रकिनारा आहे. येथे असणाऱ्या लाइटहाउसवर जाऊन तुम्ही या समुद्रकिनाऱ्याचं सौंदर्य न्याहाळू शकता. या दोन ठिकाणांव्यतिरिक्त कोववममध्ये वेली लगून आणि पद्मनाभस्वामी महालही पाहता येतील. 

तिरूअनंतरपुरमची आणखी एक खास गोष्ट म्हणजे, येथील रस्ते एकदम सुरक्षित आहेत. तुम्ही रात्रीही येथे अगदी बिनधास्त फिरू शकता. येथील नाइट लाइफही तुम्ही एन्जॉय करू शकता. 

कसे पोहोचाल? 

तिरूअनंतरपुरमला जाण्यासाठी तुम्ही नवी दिल्ली, मुंबई, कोच्ची आणि बेंगळूरू पासून फ्लाइट घेऊ शकता. तिरूअनंतरपुरम एअरपोर्टवर उतरल्यानंतर टॅक्सी करून तुम्ही ठरविलेल्या ठिकाणापर्यंत पोहचू शकता. तुम्ही ट्रेननेदेखील तिरूअनंतरपुरमला जाऊ शकता. यासाठी नवी दिल्ली, मुंबई, चेन्नई, इंदौर आणि बेंगळूरू यांसारख्या ठिकाणांवरून तिरूअनंतरपुरमला जाण्यासाठी ट्रेन पकडू शकता. त्रिवेंद्रम मेल, अनंतपुरी एक्सप्रेस, स्वर्णजयंती एक्सप्रेसने जाऊ शकता. तुम्ही स्वतः कार घेऊनही जाऊ शकता. 

Web Title: Do visit thiruvananthapuram this monsoon know best time places to see and how to reach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.