विदेशात फिरण्यासाठी जाण्याऐवजी भारतातील 'या' शहरांना भेट द्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 17:27 IST2018-10-29T17:24:50+5:302018-10-29T17:27:20+5:30
एखादी टूर प्लॅन करताना सर्वात आधी विदेशातील शहरांना पसंती देण्यात येते. प्रत्येकाचाच यूरोप, लंडन याठिकाणी जाण्याचा विचार असतो. मग त्यासाठी बजेटची जुळवाजुळव करण्यात येते.

विदेशात फिरण्यासाठी जाण्याऐवजी भारतातील 'या' शहरांना भेट द्या!
एखादी टूर प्लॅन करताना सर्वात आधी विदेशातील शहरांना पसंती देण्यात येते. प्रत्येकाचाच यूरोप, लंडन याठिकाणी जाण्याचा विचार असतो. मग त्यासाठी बजेटची जुळवाजुळव करण्यात येते. परंतु तुम्हाला माहीत आहे का? विदेशापेक्षाही भारतामध्ये अनेक अशी ठिकाणं आहेत ज्यांचं असं वेगळं महत्त्व आहे. ही ठिकाणं पाहण्यासाठी अनेक विदेशी पर्यंटकही भारतात येतात. जाणून घेऊया अशा काही ठिकाणांबाबत जी आपल्या वेगळ्या महत्त्वासाठी प्रसिद्ध आहेत...

अहमदाबाद रोडजवळ असलेलं हे ठिकाणं प्रसिद्ध टूरिस्ट पॉइन्ट म्हणूनही ओळखलं जातं. येथील कुकडी नदीवर तयार झालेले नॅचरल पॉटहोल्सचं सौंदर्य पाहण्यासारखं आहे. याव्यतिरिक्त वेसॉल्ट रॉक्सने तयार झालेले कर्व्स आणि त्यातून वाहणारं पाणी फार सुंदर दृश्य आहे.

जर तुम्ही कर्नाटकमध्ये फिरण्यासाठी जात असाल तर तुम्ही उदुपीला नक्की भेट द्या. येथे तुम्हाला विशाल अरबी समुद्र, हिल पॉइन्ट्स आणि सुपरनिका नदीमध्ये बोटिंग करण्याचा आनंद घेऊ शकता.

गुजरातमधील जामनगरमध्ये असलेलं नरारा मरीन नॅशनल पार्कमध्ये तुम्हाला अद्भुत निसर्गसौंदर्य पाहायला मिळेल. गल्फ ऑफ कच्छमध्ये असलेल्या या पार्कमध्ये सी कोरल पाण्यावर पाहायला मिळतात. याचसोबत येथे सुंदर समुद्री जीवांना पाहता येते.

संगमरवराने तयार करण्यात आलेल्या इमारती तुम्ही पाहिल्या असतील परंतु, येथे तुम्हाला संगमरवरापासून तयार झालेले डोंगर पाहायला मिळतील. याव्यतिरिक्त येथे एक सुंदर वॉटरफॉलदेखील आहे.