विमानात चुकूनही सोबत नेऊ नका खायची 'ही' एक गोष्ट, बसेल मोठा फटका...प्रवासाची जाईल मजा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 12:19 IST2026-04-10T12:18:52+5:302026-04-10T12:19:47+5:30

Airplane Travel Tips : सामान्यपणे आपल्या गरजेच्या वस्तू आपण सोबत असलेल्या बॅगमध्ये ठेवतो. पण यात किचन किंवा व्हॅनिटी बॉक्समध्ये ठेवलेल्या काही गोष्टी विमानात घातक मानल्या जाऊ शकतात.   

Airplane Travel Tips : Which items you should not take with you in flight | विमानात चुकूनही सोबत नेऊ नका खायची 'ही' एक गोष्ट, बसेल मोठा फटका...प्रवासाची जाईल मजा

विमानात चुकूनही सोबत नेऊ नका खायची 'ही' एक गोष्ट, बसेल मोठा फटका...प्रवासाची जाईल मजा

Airplane Travel Tips : आपण पाहिलं असेल की, बस किंवा रेल्वेच्या तुलनेत विमानाने प्रवास करण्याचे नियम फारच कठोर असतात. बऱ्याच लोकांना हे नियम माहीत नसतात. खासकरून नव्याने विमानाने प्रवास करणाऱ्या लोकांना. अशात त्यांचा आनंदाने प्रवास करण्याचा पूर्ण मूड निघून जाऊ शकतो. सामान्यपणे आपल्या गरजेच्या वस्तू आपण सोबत असलेल्या बॅगमध्ये ठेवतो. पण यात किचन किंवा व्हॅनिटी बॉक्समध्ये ठेवलेल्या काही गोष्टी विमानात घातक मानल्या जाऊ शकतात.   

विमानात सुरक्षा व्यवस्था कडक असते. त्यामुळे चेकिंगदरम्यान जर काही बंदी असलेल्या गोष्टी दिसल्या तर त्या लगेच ताब्यात घेतल्या जातील. त्या वस्तू आपल्याला तिथेच सोडाव्या लागतील. अशात आपल्याला माहिती असलं पाहिजे की, विमानात कोणत्या वस्तू नेण्यास बंदी असते. 

वाळलेलं नारळ  

बरेच लोक कुठेतरी देव दर्शनासाठी जातात आणि सोबत नारळही आणतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, विमानात वाळलेलं नारळ सोबत नेण्यास बंदी असते. कारण वाळलेल्या नारळामध्ये तेलाचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे ते ज्वलनशील म्हणजे आग पकडणारी वस्तू मानलं जातं.  

पॉवर बॅक  

मोबाइलसाठी बरेच लोक पॉवर बॅक वापरतात. पण पॉवर बॅक आपण केवळ हँड बॅगेज कॅबिन बॅगमध्ये नेऊ शकता. हे चेक-इन लगेजमध्ये ठेवण्यास मनाई आहे. कारण याने आग लागण्याचा धोका असतो.  

धारदार वस्तू  

कात्री, चाकू, नेल कटर इतकंच काय तर आपण साधी सुई देखील कॅबिन बॅगमध्ये सोबत नेऊ शकत नाहीत. धारदार - टोकदार कोणतीही वस्तू सोबत विमानात नेता येत नाही.  

मसाले आणि मिरची पावडर  

जास्त प्रमाणात मसाले किंवा मिरची पावडर कॅबिन बॅगमध्ये घेऊन जाण्यावर बंदी असते. कारण ते सुरक्षेच्या दृष्टीने घातक मानले जातात. या गोष्टी आपण लगेच कॅबिनमध्ये ठेवू शकता.   

Web Title : फ्लाइट में ये चीजें न रखें, यात्रा हो जाएगी बेकार!

Web Summary : फ्लाइट में सूखा नारियल, पावर बैंक (चेक-इन में), धारदार वस्तुएं और ज्यादा मसाले न ले जाएं। सुरक्षा नियम सख्त हैं; वर्जित चीजें जब्त होंगी, जिससे यात्रा खराब हो सकती है। योजना बनाकर चलें!

Web Title : Don't pack these items on flights; it'll ruin your trip!

Web Summary : Avoid carrying dried coconuts, power banks (in check-in), sharp objects, and excessive spices on flights. Security restrictions are strict; prohibited items will be confiscated, spoiling your travel experience. Plan accordingly!