जगातली ५ सर्वात कलरफूल ठिकाणं, हे रंगांसोबत आयुष्यही एकदा करावं रंगीत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2019 13:16 IST2019-05-02T13:15:28+5:302019-05-02T13:16:32+5:30
रताबाहेरील अशी ५ कलरफूल ठिकाणे तुम्ही तुमच्या बकेट लिस्टमध्ये सामिल करू शकता. ही पाचही ठिकाणं जगातली सर्वात कलरफूल ठिकाणं म्हणूण लोकप्रिय आहेत.

जगातली ५ सर्वात कलरफूल ठिकाणं, हे रंगांसोबत आयुष्यही एकदा करावं रंगीत!
उन्हाळा आला की, अनेकजण भारतातील वेगवेगळ्या ठिकाणांवर फिरायला जाण्याच बेत आखतात. तर काही लोक भारताबाहेर त्यांच्या बकेट लिस्टमधील ठिकाणांना भेट देतात. भारताबाहेरील अशी ५ कलरफूल ठिकाणे तुम्ही तुमच्या बकेट लिस्टमध्ये सामिल करू शकता. ही पाचही ठिकाणं जगातली सर्वात कलरफूल ठिकाणं म्हणूण लोकप्रिय आहेत. या ठिकाणांना भेट देऊन तुमच्या आयुष्यातही वेगळे रंग भरले जाऊ शकतात.
१) द रेनबो व्हिलेज, तायवान
तायवानच्या रेनबो व्हिलेजमध्ये तुम्ही एन्ट्री घेताच तुमचं स्वागत भींतींवर केलेल्या प्राण्यांच्या, मनुष्यांच्या आणि फुलांच्या पेटींग्सने होतं. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हे शहर अजूनही विकासकांच्या तावडीत सापडलं नाहीये. त्यामुळे निसर्गाचा खरा आनंद तुम्ही इथे घेऊ शकता. या गावात केवळ एक माजी सैनिक हॉंग हा राहत होता. मग त्याने गावातील भींतींवर पेंटीग करण्यास २०१० मध्ये सुरूवात केली आणि या गावाचा चेहरा मोहरा बदलून टाकला.
२) Cinque Terre, Italy
Cinque Terre हे ठिकाण पाच छोट्या छोट्या गावांचा समूह आहे. येथील इमारती फारच कलरफूल आणि आकर्षक आहेत. हेच या ठिकाणांचं आकर्षणाचं केंद्र आहे. फिरायला आल्यावर या शहराचे रंग पर्यटकांच्या आयुष्यातही वेगळे रंग घेऊन येतात.
३) Rainbow Mountain, Peru
साधारण पाच वर्षांपूर्वी पेरुमधील रेनबो माउंटेनचा शोध लावला गेला. हे फोटो पाहून तुम्हाला कळालं असेल की, या पर्वताला रेनबो माउंटेन म्हटलं जातं. १७ हजार फूट उंच या पर्वताची सर्वात मोठी खासियत म्हणजे पावसाळ्यात दिसणारे इंद्रधनुष्याचे रंग या पर्वतावर एकत्र दिसू लागतात.
४) Grand Prismatic Spring, US
अमेरिकेतील सर्वात मोठा आणि जगातला तिसरा सर्वात मोठा गरम पाण्याचा कुंड Grand Prismatic Spring हा आहे. हा इथे स्टोन नॅशनल पार्कमध्ये आहे. या स्प्रिंगचा आकार अडीचशे ते तीनशे फूट आहे. यातील पाण्याचं तापमान नेहमी ७१ सेंटीग्रेड इतकं असतं. तर यात २००० लीटर पाणी असतं. हे पाणी खास प्रकारच्या बॅक्टेरिया आणि मिनरल्समुळे चमकदार लाल, नारंगी रंगाचं दिसतं.
५) Farm Tomita, Japan
(Image Credit : ikidane-nippon.com)
वेगवेगळ्या रंगीबेरंगी फुलांनी सजलेलं हे ठिकाण होक्कायडोमध्ये आहे. हे जपानमधील सर्वात लोकप्रिय ठिकाणांपैकी एक आहे. इथे तुम्ही वेगवेगळ्या प्रजातींची, सुगंधाची फुले बघू शकता.