उन्हाळ्याच्या सुट्टीत कॅम्पिंगचा आनंद घेण्यासाठी 5 बेस्ट ठिकाणं
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2018 12:16 IST2018-04-21T12:16:53+5:302018-04-21T12:16:53+5:30
आम्ही तुमच्यासाठी काही या उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी काही खास ठिकाणांची माहिती घेऊन आलो आहोत. या ठिकाणांवर जाऊन तुम्ही तुमची उन्हाळ्याची सुट्टी पूर्णपणे एन्जॉय करु शकता.

उन्हाळ्याच्या सुट्टीत कॅम्पिंगचा आनंद घेण्यासाठी 5 बेस्ट ठिकाणं
उन्हाळ्याच्या सुट्टीत अनेकजण फिरायला जाण्याचे प्लॅन करत असतात. पण अनेकांना नेहमीच्या ठिकाणावर जाऊन जाऊन कंटाळा आलेला असल्याने अनेकजण वेगळ्या डेस्टीनेशनच्या शोधात असतात. प्रत्येकाला प्रत्येकवेळी वेगळ्या ठिकाणी यायचं असतं. त्यामुळे आम्ही तुमची अडचण दूर करतोय. आम्ही तुमच्यासाठी काही या उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी काही खास ठिकाणांची माहिती घेऊन आलो आहोत. या ठिकाणांवर जाऊन तुम्ही तुमची उन्हाळ्याची सुट्टी पूर्णपणे एन्जॉय करु शकता.
1) ऋषिकेश, उत्तराखंड
कॅम्पिंगसाठी उत्तराखंडमधील ऋषिकेश या ठिकाणाला बेस्ट डेस्टीनेशन मानलं जातं. आध्यात्मिक नगरी असूनही हे ठिकाण अॅडव्हेंचरसाठीही लोकप्रिय आहे. येथील नद्यांच्या तटावर तुम्ही कॅम्पिंग करु शकता. त्यासोबतच दाट जंगलांमध्येही तुम्ही कॅम्पिंग करु शकता. तसेच तुम्ही गंगा नदीच्या तटावरील वाळूमध्येही कॅम्प लावू शकता.
2) कसोल, हिमाचल प्रदेश
उन्हाळ्याच्या गरमीपासून सुटका मिळवण्यासाठी हे ठिकाण फारच परफेक्ट आहे. थंडगार वारा आणि जंगलाच्या मधोमध तुम्ही कॅम्प लावू शकता आणि एन्जॉय करु शकता. कॅम्पिंगसाठी इथे मोठ्या प्रमाणात परदेशी पर्यटक येतात. कसोलला इस्त्राईलचे पर्यटक आपलं घर मानतात.
3) स्पीति व्हॅली, हिमाचल प्रदेश
हिमाचल प्रदेशातील कॅम्पिंगसाठी आणखी एक ठिकाण प्रसिद्ध आहे ते म्हणजे स्पीति व्हॅली. खासकरुन फोटोग्राफर्ससाठी ही जागा स्वर्ग मानली जाते. येथील निसर्गाच्या तुम्ही प्रेमात पडाल. इथे तुम्ही कॅम्पची बुकिंगही करु शकता.
4) अंजुना बीच, गोवा
गोवा हे ठिकाण नेहमीच पार्टी आणि ड्रिंक्ससाठी ओळखलं जातं. पण फार कमी लोकांना माहिती आहे की, गोव्यातील सुंदर समुद्र किनारे आणि डोंगरांवर तुम्ही कॅम्पिंगचा आनंद घेऊ शकता. तसे तर गोव्यात अनेक समुद्र किनारे आहेत. पण येथील अंजुना बीचवर तुम्ही अॅडव्हेंचर आणि कॅम्पिंगचा आनंद घेऊ शकता.
5) सोनमर्ग, जम्मू-कश्मीर
जम्मू-काश्मीर आपल्या सुंदर पर्वतांसाठी जगात प्रसिद्ध आहे. हजारो पर्यचक इथे दरवर्षी येतात. तुम्हीही या सुट्टीत सोनमर्गला आपल्या मित्रांसोबत कॅम्पिंगसाठी जाऊ शकता.