एसटी महामंडळातर्फे २000 जादा बसेस
By Admin | Updated: August 3, 2015 22:26 IST2015-08-03T22:26:35+5:302015-08-03T22:26:35+5:30
एसटी महामंडळातर्फे २000 जादा बसेस

एसटी महामंडळातर्फे २000 जादा बसेस
ए टी महामंडळातर्फे २000 जादा बसेस१,३00 बसेस ग्रुप बुकींग पध्दतीने सोडणारमुंबई - रेल्वेकडून यंदा गणेशोत्सवासाठी २२४ फेर्यांची सोय करण्यात आली असतानाच आता एसटी महामंडळाकडून दोन हजार जादा बसेसची सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापैकी १,३00 बसेस ग्रुप बुकींग पध्दतीने सोडण्यात येणार असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले. दरवर्षी गणेशोत्सवासाठी रेल्वे आणि एसटी महामंडळाकडून जादा फेर्या तसेच बसेसची सोय केली जाते. यंदा रेल्वेकडून २२४ फेर्या सोडण्यात येणार असून मध्य रेल्वेकडून ६0 तसेच पश्चिम रेल्वेकडून ३८ फेर्यांची घोषणा करण्यात आली आहे. मागील वर्षी रेल्वेकडून २१४ फेर्या सोडण्यात आल्या होत्या. एसटी महामंडळाकडून यंदा दोन हजार जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. मागील वर्षी १,९१३ बसेस सोडण्यात आल्या होत्या. सोडण्यात येणार्या जादा बसेसपैकी १,३00 बसेस ग्रुप बुकींग पध्दतीने सोडण्यात येत असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले. १३ ते १६ सप्टेंबरपर्यंतचे ग्रुप आरक्षण हे ४ ते ७ ऑगस्ट रोजी संबंधित आगारात प्राप्त होणार आहे. ऊर्वरीत जादा बसचे आरक्षण १२ ऑगस्टपासून एसटीच्या ६६६.े२१३ू.ॅङ्म५.्रल्ल या संकेतस्थळावर तसेच सर्व आरक्षण केंद्रावर उपलब्ध होईल. ऊर्वरीत बसेस संबंधित आगार आणि स्थानकातून सोडण्यात येणार आहेत. अधिक माहीतीसाठी एसटीच्या १८00२२१२५0 या मोफत दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.