ठाण्यातून एसटीच्या ७५७ जादा बसेस गणेशोत्सवाची तयारी : पालघरमधून १६७ जादा गाडया
By Admin | Updated: September 1, 2015 21:38 IST2015-09-01T21:38:22+5:302015-09-01T21:38:22+5:30
ठाणे : गणेशोत्सवासाठी राज्य परिवहन सेवेच्या ठाणे विभागीय कार्यालयाने कोकणात जाणार्या प्रवाशांसाठी आतापर्यंत ७५७ जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. त्या सर्व जिल्हयातील चार आगारांमधून सोडण्यात येणार आहेत.

ठाण्यातून एसटीच्या ७५७ जादा बसेस गणेशोत्सवाची तयारी : पालघरमधून १६७ जादा गाडया
ठ णे : गणेशोत्सवासाठी राज्य परिवहन सेवेच्या ठाणे विभागीय कार्यालयाने कोकणात जाणार्या प्रवाशांसाठी आतापर्यंत ७५७ जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. त्या सर्व जिल्हयातील चार आगारांमधून सोडण्यात येणार आहेत.गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी समुहाने गाडयांचे आरक्षण करणार्या सर्वच प्रवाशांसाठी जादा बस देण्यात आल्या आहेत. यंदा १२ ते १६ सप्टेंबरपासून त्यांचे नियोजन केले आहे. यात १२ सप्टेंबर रोजी सहा गाड्या सोडल्या जाणार असून १३ सप्टेंबर रोजी २६, १४ सप्टेंबरला ९५, १५ सप्टेंबरला ५०८ तर १६ सप्टेंबर रोजी १२२ गाडया सोडल्या जाणार आहेत. ठाणे-१ व बोरीवलीतून या पाच दिवसांच्या काळात २७१, भाईंदरमधून ३७ तर ठाणे आगार दोनच्या मध्यवर्ती बस स्थानकातून १९२ मुलूंड पूर्व मधून २२ तर भांडूप पिममधून ९३ गाडया सोडण्यात येणार आहेत. याशिवाय, कल्याण आगारातून ३८ तर विठ्ठलवाडीतून १०४ बस सोडण्याचे नियोजन केल्याची माहिती ठाण्याचे विभागीय वाहतूक अधिकारी ए. आर. कचरे यांनी दिली. ३१ ऑगस्ट २०१५ पर्यंत समुहाने ३९३, ऑनलाईन ३३२ तर इतर ३२ अशा ७५७ जादा बसेसचे नियोजन झाल्याचेही ते म्हणाले. ....................................................................या सर्व गाडया ठाणे विभागाच्या खोपट सीबीएस, मुलूंड पूर्व, भांडूप पिम, बोरीवली, भाईंदर, कल्याण आणि विठ्ठलवाडी अशा सात वेगवेगळया ठिकाणांहून दुपारी २ ते रात्री ११ या वेळेत सोडण्यात येणार आहेत. याशिवाय, पालघर विभागीय कार्यालयानेही १६७ जादा गाड्यांचे नियोजन केल्याची माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)