राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
पवनी तालुक्यातील पिलांद्री जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत विद्यार्थ्यांना दिला जाणारा शालेय पोषण आहार निकृष्ट दर्जाचा दिला जातो, याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित करताच एकच खळबळ उडाली. वृत्ताची दखल घेत चौकशी समितीने पोषण आहाराची चाचपणी केली. ...
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे दरवर्षी शालेय क्रीडा स्पर्धा घेतल्या जातात. यात पंच म्हणून जबाबदारी सांभाळायची असल्यास तुम्हाला कोणत्याही खेळाचे नियम वा माहिती असलीच पाहिजे असे नाही. अधिकृत पंच असणेही गरजेचे नाही. ...