येवल्यात पाली भाषा वर्गास गमे यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 11:06 PM2019-10-01T23:06:54+5:302019-10-01T23:07:38+5:30

येवला : ऐतिहासिक येवलाभूमीत नाशिक येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण प्रसारक संस्था व पाली भाषा संशोधन व बहुद्देशीय संस्था यांच्या वतीने एक वर्ष कालावधीचा पदविका प्रमाणपत्र अभ्यासक्र म सुरू करण्यात आला आहे. त्या वर्गास प्रा. भाऊसाहेब गमे यांनी भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते.

Visit to Pali language class | येवल्यात पाली भाषा वर्गास गमे यांची भेट

येवल्यात पाली भाषा वर्गास गमे यांची भेट

Next
ठळक मुद्देभाऊसाहेब गाढे-पाटील यांनी सहभागी प्रशिक्षक, विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तू भेट दिल्या.


येवला येथे पाली भाषा डिप्लोमा वर्गास भेटीप्रसंगी बोलताना प्रा. भाऊसाहेब गमे व सहभागी विद्यार्थी.

 

लोकमत न्यूज नेटवर्क
येवला : ऐतिहासिक येवलाभूमीत नाशिक येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण प्रसारक संस्था व पाली भाषा संशोधन व बहुद्देशीय संस्था यांच्या वतीने एक वर्ष कालावधीचा पदविका प्रमाणपत्र अभ्यासक्र म सुरू करण्यात आला
आहे. त्या वर्गास प्रा. भाऊसाहेब गमे यांनी भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते.
माणसात वैज्ञानिक दृष्टिकोन, शील, सदाचार विकसित होण्यास पाली भाषा साहित्य साह्यभूत ठरते. स्पर्धा परीक्षेतून पुढे जाण्याची संधी पाली भाषा अभ्यासातून प्राप्त होईल. भाषा अभ्यास केवळ विशिष्ट धार्मिक लोकांकरिता नसून पाली भाषा साहित्य अभ्यासात मानवी जीवनाचे तत्त्वज्ञान सामावले असल्याचे मत प्रा. भाऊसाहेब गमे यांनी व्यक्त केले. सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब गाढे-पाटील यांनी सहभागी प्रशिक्षक, विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तू भेट दिल्या. प्रास्ताविक एस.डी. शेजवळ यांनी केले. सुरेश खळे, अभिमन्यू शिरसाठ, रत्नाकर घोडेराव, गुरु जी प्रा.दीपक खरे, प्रा. अमित बनकर, अतुल सोनवणे, मयूर सोनवणे, संतोष धनराव, आशा आहेर, बाबूलाल पडवळ, बी. के. गांगुर्डे, पंकज डोळस, सागर अहिरे, रोशन जोगदंड, दिनेश धनेश्वर, विनोद भोसले, आम्रपाली सोनवणे, राजेश्वर दोंदे, प्रगती आहेर, संतोष धनराव, कविता निखारे, गौरव थोरात, प्रा. अमित बनकर, विनोद भोसले आदींसह पाली भाषा विद्यार्थी ह्यावेळी उपस्थित होते. प्रास्ताविक शरद शेजवळ, सूत्रसंचालन मिलिंद गुंजाळ, अशोक पगारे यांनी आभार मानले.

Web Title: Visit to Pali language class

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.