सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते. Read More
Champa Shashthi 2024: आज खंडोबाच्या षडरात्रोत्सवाची सांगता. अर्थात आज चंपाषष्ठीचा (Champa Shashthi 2024) दिवस. खंडोबा हे महादेवाचे अवतार आणि शनीदेव ही न्यायाची देवता. हा एकत्रित योग तुमच्या राशीसाठी लाभदायी ठरणार की कष्टदायी ते पाहू. ...
डिसेंबर महिना सुरू झाला असून, २०२४ वर्ष जाता जाता अनेक राशींना सर्वोत्तम लाभ, फायदा आणि अनेक बाबतीत सकारात्मक अनुकूलता देणारे ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. ...