सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते. Read More
Guru Pushya Yoga October 2024: गुरुवारी गुरुपुष्यामृत योग जुळून येत आहे. दिवाळीपूर्वी हा योग येणे शुभ मानले जाते आहे. कोणत्या राशींसाठी हा कालावधी भाग्योदय, पद-पैसा वाढीचा ठरू शकेल? जाणून घ्या... ...
Astro Tips: अनेक विवाहेच्छुक मंडळी दिवाळी होता होता बोहोल्यावर चढण्याच्या तयारीत असतील. पण त्यासाठी महत्त्वाचा असतो तो म्हणजे जोडीदार! त्यासाठी युद्ध पातळीवर शोधही सुरु असेल. कोणाची लग्न गाठ कुठे, कधी आणि कशी जुळेल सांगता येत नाही. त्यामुळे प्रयत्न क ...
Diwali Astrology 2024: दसरा दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा! पण आनंद मिळवण्यासाठी आर्थिक गणित सुटावं लागतं. यासाठीच हा आठवडा दिवाळीच्या पूर्वतयारीसाठी तुमच्या राशीला अनुकल आहे की प्रतिकूल ते जाणून घ्या. ज्योतिष तज्ज्ञांच्या मते सिंह आणि मकर राशीसह ...