यवतमाळ येथे हाणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित उद्घाटक साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्याच्या निर्णयाचे राज्यातच नाही तर देशभरात वादळ उठले असून साहित्य जगताकडून तीव्र पडसाद उमटत आहेत. ...
सहगल निमंत्रण वाद उद्भवल्यामुळे शहरातील बहुतांश लेखक, कवींनीदेखील या साहित्य संमेलनावर बहिष्कार टाकला असून, सुसंस्कृत समृद्ध परंपरा जोपासणाऱ्या साहित्यकांनी अशा संमेलनापासून चार हात लांब रहावे, असे आवाहनही केले आहे. ...
साहित्य ही मतस्वातंत्र्य व अभिव्यक्ती स्वातंत्र्याची निर्मिती आहे आणि या स्वातंत्र्याचा भारतीय नागरिकांना प्राप्त झालेला अधिकार जन्मसिद्ध म्हणावा असा आहे ...
विविध माध्यमातून मतमतांतरे व्यक्त होत असताना अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुस्कटदाबीचा थेट सामना करण्यासाठी मानवी हक्क विश्लेषक अॅड. असीम सरोदे आणि राजकीय विश्लेषक विश्वंभर चौधरी यांनी पुढाकार घेतला आहे. ...
असहिष्णूतेच्या विषयावर भाषण झाल्यास सरकारला फटकारे लागतील या भीतीने उद्घाटक नयनतारा सहगल यांची यवतमाळच्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील एन्ट्रीच साहित्य महामंडळाने रोखल्याने या संमेलनाची गरिमा व विश्वासाहर्ता संपलेली आहे. ...