धरणाची पाणी पातळी तब्बल ४८ तासांनंतर कमी होत असल्याने महान धरणातून सुरू असलेला विसर्ग ३ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता बंद करण्यात आला. यादरम्यान धरणातून १०.४५ दलघमी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. सद्यःस्थितीत धरणाची पातळी ८०.३४ टक्के आहे. ...
मागील पंधरवड्यापासून संततधार पाऊस सुरू असल्याचा लाभ धरणातील पाणीसाठा वाढण्यास झाला आहे. इसापूर धरणात ५०.८१ टक्के पाणीसाठा झाला असून, अजूनही पाणलोट क्षेत्रात अधूनमधून पाऊस सुरूच असल्याने पाणीसाठा झपाट्याने वाढत असल्याचे धरण प्रशासनाने सांगितले. ...
पैठण येथील जायकवाडीच्या उर्ध्व भागातील अहमदनगर व नाशिक जिल्ह्यात बऱ्यापैकी पाऊस पडत असल्याने मागील १० दिवसात ७ टक्के जलसाठा वाढला. रविवारी जायकवाडीमध्ये १.२० टक्के जलसाठा होता. गतवर्षी आजच्या दिवशी ३३ टक्के साठा होता. ...
शनिवारी पावसाने उघडीप दिल्यानंतर धरण क्षेत्रातही पावसाचा जोर कमी झाला. कोयना आणि चांदोली धरणातून सुरू असलेला विसर्ग कायम आहे. पावसाचा जोर ओसरल्याने कृष्णा नदीच्या पातळीत किंचित वाढ झाली. मात्र, वारणा, कृष्णा नदीकाठी पुराची टांगती तलवार कायम आहे. पूरस ...
उजनी रात्री आठ वाजता ८० टक्के भरले असून, शंभर टक्के भरण्यासाठी अवघे २० टक्के पाणी पातळी कमी आहे. सध्या उजनी धरणात एकूण १०५. ४४ टीएमसी पाणीसाठा झाला असून, ४१.७८ क्युसेक उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. आणखी दोन दिवस दौंड येथील विसर्ग असाच चालू राहिल्यास उजन ...
भाटघर धरण (येसाजी कंक जलाशय) शनिवारी ३ ऑगस्ट रोजी सकाळी पूर्णक्षमतेने भरल्यामुळे धरणाच्या स्वयंचलित ४५ दरवाजांतून (मोऱ्या) निरा नदीपात्रात सुमारे ३५०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. हे धरण भरल्यामुळे पूर्व भागातील तालुक्यातील पिकासह ...
सर्वत्र पाऊस पडत असल्याने विदर्भातील तीन जिल्ह्यांच्या सीमेवर बांधलेल्या वारी भैरवगड येथील हनुमान सागर धरणातील जलाशयाच्या पातळीत वाढ होत आहे. गेल्या अकरा दिवसांत जलसाठ्यात १७.२७ टक्क्यांनी वाढल्याने पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. ...