लसंपदामंत्री गिरीश महाजन पुणेकरांच्या पाण्यावर वारंवार तोंडसुख घेत असताना पुण्याचे प्रतिनिधित्व करणारे आमदार, खासदार तोंडाला कुलूप लावून का बसले आहेत, असा सवाल सजग नागरिक मंचाने उपस्थित केला आहे. ...
खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील भीमा नदीचे पात्र कोरडे ठणठणीत पडल्याने परिसरातील खरोशी, डेहणे, शेंदुर्ली, वांजाळे, धुवोली, शिरगाव, टोकावडे या काठावरील गावांत जनावरांना, तसेच पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. भीमा नदीच्या काठावरील ...
शहराला पाणीपुरवठा करणारा सर्वात मोठा जलस्त्रोत असलेली मानार नदी कोरडीठाक पडली़ त्यामुळे निम्म्या शहराची धांदल उडाली़ लिंबोटीचे पाणी शहराला तारणार असे वृत्त ‘लोकमत’ने १ मे च्या अंकात प्रसिद्ध केले होते़ अनेक अडथळ्यांची शर्यत पार करण्यात ऩप़ला यश आले़ ...
तालुक्यातील खुटगाव ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या पांढरसडा गावातील दोन्ही विहिरी कोरड्या पडल्या आहेत. हातपंपातूनही पुरेसे पाणी निघत नाही. त्यामुळे गावकऱ्यांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. ...
माणशी १५५ लिटर पाणी योग्य आहे. पुणेकरांना मात्र माणशी ३३५ लिटर पाणी मिळते. महापालिकेला ११.५० टीएमसी पाणी उचलण्यास मंजुरी आहे; प्रत्यक्षात मात्र १७.५० टीएमसी पाणी घेतले जाते, अशी टीका करीत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी पुन्हा एकदा पुणेकरांना पाण्याव ...
यंदाच्या वर्षी सरासरीपेक्षा कमी झालेल्या पावसाचा फटका नांदेडकरांना सोसावा लागत आहे. जलस्त्रोतातील पाणी आटू लागल्याने टँकरची मागणी वाढत असून सद्य:स्थितीत जिल्ह्यातील २६ वाड्या आणि २७ गावांमध्ये ८४ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाणीपुरवठ्यासाठ ...
भूजल सर्वेक्षण विभागाने केलेल्या पाहणीमध्ये १९१ गावांमधील विहिरींची पाणी पातळी एक ते दोन मीटर पर्यंत खाली गेली आहे. त्यामुळे प्रशासनाने या गावांना संभाव्य टंचाईग्रस्त गावे म्हणून घोषीत केली असून त्यामध्ये सर्वाधिक गडचिरोली तालुक्यातील ४४ गावांचा समाव ...
अंबानगरीत जीवन प्राधिकरणच्यावतीने एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. अस्तित्वातील १५ पाण्याच्या टाकीवरून अंबानगरीला पाणीपुरवठा होत असला तरी उच्च दाबाने नागरिकांच्या घरांपर्यंत पाणी पोहचत नसल्याच्या तक्रारी आहेत. ...