वाशिम : वातावरणातील बदलामुळे जिल्ह्यात ताप, हिवताप, सर्दी, खोकला, घशाला खवखव आदी साथरोग बळावले आहेत. ग्रामीण भागात काही ठिकाणी अज्ञात त्वचारोगाने नागरिक भयभीत आहेत. उपचारार्थ सरकारी रुग्णालयांसह खासगी दवाखान्यांत रुग्णांनी धाव घेतल्याने रुग्णालये हा ...
शिरपूर जैन (वाशिम) : येथे मागील आठवडाभरापासुन एका पिसाळलेल्या माकडाने हैदोस घातला असून आतापर्यंत तीन जणांना चावा घेत गंभीर जखमी केले. दरम्यान, या माकडाला पकडण्यासाठी वनविभागाने तीन दिवस शर्थीचे प्रयत्न करूनही माकड जेरबंद करण्यात यश मिळाले नाही. ...
वाशिम: लिंगायत धर्माला संविधानिक स्वतंत्र मान्यता व अल्पसंख्यांक दर्जा मिळावा, या मागणीसाठी रविवार, २८ जानेवारी रोजी यवतमाळ येथे अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीच्या वतीने लिंगायत समाजबांधवांच्या विराट विदर्भस्तरीय महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. ...
वाशिम: येथील सावली प्रतिष्ठान या सामाजिक संघटनेनेने नायलॉन मांजाने मानेला व चोचेला जखम झालेल्या पारवा या पक्षावर उपचार करून जीवदान दिले. दरम्यान, मकर संक्रातीच्या पृष्ठभूमीवर पतंगबाजीसाठी बंदी असूनही वापरात येत असलेला मांजा मुक्या पक्ष्यांसाठी कर्दन ...
वाशिम : ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ आजारापासून सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून २८ जानेवारी रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविली जाणार आहे. वाशिम जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली असून, फिरते बूथदेखील कार्यरत केले जाणार आहेत. ...
प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय, निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी ५ टक्के आरक्षण देण्यासंदर्भात शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या १ जुलै २०१६ रोजीच्या शासन निर्णयानुसार सर्वसमावेशक सुचना निर्गमित केलेल्या आहेत. ...
वाशिम : राज्य शासनाच्या महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम कायद्यानुसार गृह विभागाशी संबंधित १७ सेवांना ऑनलाईनची जोड दिली जाणार आहे. नागरिकांनी यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी केले. ...