मंगरुळपीर: तालुक्यात पाणीटंचाईच्या झळा अत्यंत तीव्र झाल्या आहेत. ग्रामीण भागामधील जनतेला पिण्यासाठी पाणी मिळेनासे झाले असून, विविध ठिकाणी शेतशिवारातील विहिरीवरून बैलबंडीने पाणी आणून लोक आपली तहान भागवित आहेत. ...
वाशिम : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील ९८ हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्याना कर्जमाफी मिळाला आहे. मात्र, अंतिम यादी अद्याप प्राप्त झालेली नसल्याने अनेक शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज मिळण्यात व्यत्यय निर्माण झाला आहे. ...
मानोरा: दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या युवकाला पात्रतेनुसार शासकीय नोकरीत सामावून घेण्यात आले नाही. प्रामाणिकपणे रोजगाराची इच्छा असतानाही ती पूर्ण होत नसल्याने या युवकाने आता थेट देशी, विदेशी दारू विक्रीचा परवानाच शासनाकडे निवेदनाद्वारे मागितला आहे. ...
रिसोड: मागील १० दिवसांपासून रिसोड शहरात उन्हाचा पारा चांगलाच चढत आहे. त्यामुळे नागरिक गर्मीने हैराण झाले असून, घशाला पडलेली कोरड मिटविण्यासाठी ते थंडपेयांचा आधार घेत असल्याने थंडपेयांच्या दुकानांवर नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. ...
वाशिम: पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या मंगरुळपीर तालुक्यातील गावांत श्रमदानाची लाट उसळली असून, जलसंधारणाच्या कामांसाठी श्रमदान करण्यात महिला आघाडीवर आहेत. ...
वाशिम : जेमतेम परिस्थिती असतांना इच्छाशक्ती व मेहनती स्वभावामुळे एका मध्यमवर्गिय कुटुंबातील ‘शंतनु’ने मॉडलिंग जगतात भरारी घेतली असून या क्षेत्रात त्याचा नावलौकीक असल्याचे दिसून येत आहे. ...
कारंजा : मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत राज्य मार्ग-२७४ ला जोडणाऱ्या जानोरी, पानगव्हाण, उकर्डा, पारवा कोहर तसेच चांदई रस्त्याकरिता ७ कोटी ११ लाख १५ हजार रूपयांचा निधी मंजुर करण्यात आला होता. ...