मागील काही दिवस बाजार समित्यांत तुरीच्या दरात चढउतार होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शुक्रवार आणि शनिवारी आठवड्याच्या अखेरच्या दिवशी मात्र तुरीच्या दरात काहीशी सुधारणा झाल्याचे लिलावातील आकडेवारीतून दिसले. ...
राज्यातील जिल्ह्यांमध्ये २०२२-२३ पासून दुसऱ्या टप्प्यात राबविण्यात येत असलेल्या 'डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन'च्या माध्यमातून पहिल्याच वर्षी ४ हजार शेतकरी गटांनी त्यांची २ लाख १ हजार ५५५ हेक्टर जमीन सेंद्रिय पद्धतीने पिकविण्यात येणाऱ्या पिक ...
मागील पंधरवड्यापासून संततधार पाऊस सुरू असल्याचा लाभ धरणातील पाणीसाठा वाढण्यास झाला आहे. इसापूर धरणात ५०.८१ टक्के पाणीसाठा झाला असून, अजूनही पाणलोट क्षेत्रात अधूनमधून पाऊस सुरूच असल्याने पाणीसाठा झपाट्याने वाढत असल्याचे धरण प्रशासनाने सांगितले. ...
सर्वत्र पाऊस पडत असल्याने विदर्भातील तीन जिल्ह्यांच्या सीमेवर बांधलेल्या वारी भैरवगड येथील हनुमान सागर धरणातील जलाशयाच्या पातळीत वाढ होत आहे. गेल्या अकरा दिवसांत जलसाठ्यात १७.२७ टक्क्यांनी वाढल्याने पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. ...
अकोला व मूर्तिजापूर शहरासह ६४ खेडी ग्रामीण पाणीपुरवठा योजनेंतर्गत गावांची तहान भागविणारे येथील काटेपूर्णा धरणाचा जलसाठा १ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता ८० टक्क्यांवर पोहोचल्याने धरणाचे चार वक्रद्वार ३० सेंटीमिटरने उघडण्यात आले. ...
पुढील चारही दिवस पावसाचा मुक्काम कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामध्ये ४ ऑगस्टपर्यंत सार्वत्रिक, तर ५ ऑगस्ट रोजी बहुतांश भागात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. ...