मागील पंधरवड्यापासून संततधार पाऊस सुरू असल्याचा लाभ धरणातील पाणीसाठा वाढण्यास झाला आहे. इसापूर धरणात ५०.८१ टक्के पाणीसाठा झाला असून, अजूनही पाणलोट क्षेत्रात अधूनमधून पाऊस सुरूच असल्याने पाणीसाठा झपाट्याने वाढत असल्याचे धरण प्रशासनाने सांगितले. ...
सर्वत्र पाऊस पडत असल्याने विदर्भातील तीन जिल्ह्यांच्या सीमेवर बांधलेल्या वारी भैरवगड येथील हनुमान सागर धरणातील जलाशयाच्या पातळीत वाढ होत आहे. गेल्या अकरा दिवसांत जलसाठ्यात १७.२७ टक्क्यांनी वाढल्याने पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. ...
अकोला व मूर्तिजापूर शहरासह ६४ खेडी ग्रामीण पाणीपुरवठा योजनेंतर्गत गावांची तहान भागविणारे येथील काटेपूर्णा धरणाचा जलसाठा १ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता ८० टक्क्यांवर पोहोचल्याने धरणाचे चार वक्रद्वार ३० सेंटीमिटरने उघडण्यात आले. ...
पुढील चारही दिवस पावसाचा मुक्काम कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामध्ये ४ ऑगस्टपर्यंत सार्वत्रिक, तर ५ ऑगस्ट रोजी बहुतांश भागात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. ...
कारंजा तालुक्यातील पिंप्री फॉरेस्ट आणि मानोरा तालुक्यातील म्हसणीनजीक असलेल्या अडाण प्रकल्पाच्या पातळीत सततच्या पावसामुळे वाढ होत आहे. अशात पातळी नियंत्रित करण्यासाठी चार दिवसांपासून या प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. ...
शेतातील मातीचा दर्जा टिकून राहिला तरच उत्पादनात भर पडणार आहे. ही बाब लक्षात घेऊन वाशिम तालुक्यातील ३०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनच्या माध्यमातून विषमुक्त सेंद्रिय भाजीपाला उत्पादन घेणे सुरू केले आहे. उत्पादित मालाच ...