लांबलेला पाऊस, विष्णूपुरीतून झालेला अवैध पाणीउपसा आणि महापालिकेसह महावितरण, जिल्हा प्रशासनाने अवैध पाणी उपशाकडे केलेल्या दुर्लक्षाचा फटका नांदेडकरांना बसला असून, शहरावरील जलसंकट आणखी तीव्र झाले आहे. ...
भीषण नांदेडकरांसाठी सिद्धेश्वर धरणातून १० जून रोजी पाणी सोडण्यात आले होते़ हे पाणी टप्प्याटप्प्याने सोडण्यात आले असून तब्बल पंधरा दिवसानंतर विष्णूपुरी प्रकल्पात सोडलेल्या १४ दलघमीपैकी ७ दलघमी पाणी पोहोचले आहे़ ...
पावसाचे आगमन लांबल्याने चिंताग्रस्त झालेल्या आणि पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या नांदेडकरांना दिलासा देणारी बाब घडली असून विष्णूपुरी प्रकल्पात आजघडीला २.१० दलघमी पाणी उपलब्ध झाले आहे. या पाण्यातून १५ जुलैपर्यंत नांदेडकरांची तहान भागणार आहे. ...
शहराची तहान भागविण्यासाठी सिद्धेश्वर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यावर आणखी १५ दिवस पोलिसांसह महापालिका, पाटबंधारे विभागाच्या पथकांचा पहारा राहणार आहे. ...