विजय हजारे करंडक स्पर्धा रणजी एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा म्हणून ओळखली जाते. निर्धारित षटकांच्या क्रिकेटमध्ये २००२-०३ साली या स्पर्धेला सुरुवात झाली. स्थानिक क्रिकेट संघांतील खेळाडूंना उत्तम व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशातून या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. भारताचे माजी क्रिकेटपटू विजय हजारे यांचे नाव या स्पर्धेला देण्यात आले आहे. Read More
Vijay Hazare Trophy: फिरकीपटू तनुष कोटीयानच्या दमदार माऱ्याच्या जोरावर मुंबईने विजय हजारे एकदिवसीय स्पर्धेत बंगालवर आठ गड्यांनी मात केली. प्रथम फलंदाजीला आलेल्या बंगालचा डाव मुंबईने ३१.३ षटकांत अवघ्या १२१ धावांत गुंडाळला. ...
Maharashtra Captain Ruturaj Gaikwad ऋतुराज गायकवाडनं यंदाच्या स्पर्धेत सर्वाधिक ६०३ धावांचा पराक्रम केला आहे. त्यानं केवळ पाच सामन्यांत चार शतकांसह ही आघाडी घेतली आहे. ...
Vijay Hazare Trophy : जयपूरमध्ये खेळल्या गेलेल्या नागालँड विरुद्ध त्रिपुरा सामन्यामध्ये नागालँडच्या संघाने प्रथम फलंदाजी केली. मात्र त्रिपुराच्या भेदक माऱ्यासमोर त्यांचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला आणि त्यांचा संपूर्ण संघ ४८ धावांत गडगडला. ...
हार्दिकला तंदुरुस्ती सिद्ध करण्यासाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत ( NCA) दाखल होण्यास बीसीसीआयने सांगितले. तंदुरुस्ती सिद्ध केल्यानंतरच त्याचा पुनरागमनासाठी विचार केला जाणार असल्याचे स्पष्ट संकेत BCCIकडून दिले गेले आहेत. ...