Ruturaj Gaikwad : महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याची विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील कामगिरी सुसाट सुरू आहे. सलग तीन शतकानंतर ऋतुराजला चौथ्या सामन्यात फार कमाल दाखवता आली नव्हती, परंतु आज चंडिगढविरुद्घच्या सामन्यात ऋतुराजनं आणखी स्फोटक खेळी केली. त्यानं आजही शतकी खेळी केली. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील त्याचे हे पाचव्या सामन्यातील चौथे शतक ठरले.
केरळ संघाविरुद्ध ऋतुराजनं १२९ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारांसह १२४ धावा केल्या होत्या. तत्पूर्वी, त्यानं छत्तीसगडविरुद्धच्या सामन्यात १४३ चेंडूंत नाबाद १५४ धावा चोपल्या होत्या. त्यातील ८६ धावा या १४ चौकार व ५ षटकार अशा १९ चेंडूंत जोडल्या होत्या. मध्य प्रदेश विरुद्ध ३२९ धावांचा पाठलाग करताना ऋतुराजनं ११२ चेंडूंत १४ चौकार व ४ षटकारांसह १३६ धावा केल्या होत्या आणि छत्तीसगडविरुद्ध २७६ धावांचा पाठलाग करताना त्यानं निम्म्या धावा केल्या होत्या.
आज चंडिगढ संघाविरुद्धच्या सामन्यात ३१० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऋतुराजनं पुन्हा एकदा कर्णधाराला साजेशी खेळी केली. प्रथम फलंदाजी करताना मनन वोहराच्या १४१ धावा आणि अर्सलान खान ( ८७) व ए कौशिक ( ५६) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर चंडिगढनं ७ बाद ३०९ धावा केल्या. महाराष्ट्राच्या पी दाधे यानं ४९ धावांत ४ विकेट्स घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना ऋतुराज गायकवाड व वाय नाहर यांनी पहिल्या विकेटसाठी १०९ धावा जोडल्या. पण, नाहर ३८ धावांवर माघारी परतल्यानंतर महाराष्ट्राची गाडी घसरली. राहुल त्रिपाठी ( ०), अंकित बावणे ( १२), नौशाद शेख ( ०) हे झटपट माघारी परतले. ऋतुराज एका बाजूनं खिंड लढवत आहे. त्यानं १०० चेंडूंत ७ चौकार व ३ षटकार खेचून नाबाद १०७ धावा केल्या आहेत. महाराष्ट्राच्या ३४ षटकांत ४ बाद १८४ धावा झाल्या असून त्यांना १२५ धावा हव्या आहेत.
दरम्यान, यंदाच्या विजय हजारे ट्रॉफीत ५००+ धावा करणारा ऋतुराज हा पहिलाच फलंदाज ठरला आहे. विजय हजारे ट्रॉफीच्या एका पर्वात चार शतक करणाऱ्या विराट कोहली, पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल या पंक्तित आता ऋतुराजचे नाव सामील झाले आहे. ( Virat Kohli, Prithvi Shaw, Devdutt Padikkal and Ruturaj Gaikwad has four hundreds in a single Vijay Hazare season) .
Most centuries in a single edition of Vijay Hazare Trophy:
4 : Virat Kohli (Delhi), 2008/09
4 : Prithvi Shaw (Mumbai), 2020/21
4 : Devdutt Padikkal (Karnataka), 2020/21
4 : Ruturaj Gaikwad (Maharashtra), 2021/22*
Web Title: Ruturaj Gaikwad scores his 4th hundred in just 5 matches, Gaikwad becomes the first batsman to complete 500 runs in Vijay Hazare 2021-22
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.