विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला. Read More
विकी कौशलच्या ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटाची बॉक्सआॅफिसवरची घोडदौड अद्यापही सुरु आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाने एका झटक्यात २०१८ मधील तीन सुपरहिट चित्रपटांना मागे टाकत, एक नवा विक्रम रचला आहे. ...
विकी कौशलचा नुकताच प्रदर्शित झालेला 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खूप चांगला रिस्पॉन्स मिळत आहे. या चित्रपटातील विकी कौशलच्या भूमिकेला व चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. ...
काल प्रजासत्ताक दिनी ‘उरी - द सर्जिकल स्ट्राईक’ची अख्खी टीम वाघा बॉर्डरवर पोहोचली. येथे पोहोचल्यानंतर विकी कौशल व यामी गौतम यांनी भारतीय जवानांना सलामी दिली. ...
उरी सिनेमाचा निर्मात रोनी स्क्रूवालाने आधीच उरीच्या कामाईमधून एक कोटी रुपये शहीद जवानांच्या विधवा पत्नींसाठी दिलीय. यानंतर आणखी एक अभिमानास्पद निर्णय उरीच्या टीमने घेतला आहे ...
‘राजी’ आणि ‘संजू’ या चित्रपटातील दमदार अभिनयाने रसिकांची मने जिंकणारा विकी कौशल सध्या जाम खूश आहे. ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ या नुकत्याच रिलीज झालेल्या चित्रपटानंतर तर विकीचा ‘जोश’ बघण्यासारखा आहे. पर्सनल लाईफमध्येही त्याचा ‘जोश’ पाहण्यासारखा आहे. ...