कुपोषण मुक्तीमध्ये या भाज्यांमधील घटक द्रव्यांचा आवर्जून विचार करायला हवा, हा आग्रहही वाढता आहे. श्रावणामध्ये मांसाहार वर्ज्य असल्याने गावठी रानभाज्यांची मागणी वाढते. ...
युरोप खंडातील सर्वोच्च शिखर असलेल्या एल्ब्रुझ शिखरावर वसईतील हर्षाली वर्तक हिने तिरंगा फडकावत देशाची मान उंचावली आहे. जगातील सात उंच शिखरांपैकी दोन शिखरे तिने आठ महिन्यात पादाक्रांत केली आहेत. ...
मायखोप ग्रुप ग्रामपंचायतीअंतर्गत झांजरोली, बंदाठे आणि रोठे या पेसा अंतर्गत तीन गावांना शासनाकडून येणाऱ्या निधीचा आणि जमाखर्चाचा हिशेब सरपंच तसेच ग्रामसेवकांकडून पेसा कमिटीला सादर केला जात नाही. ...
वसईमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ तुंगारेश्वर येथे सुरक्षेसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी धबधब्याच्या जवळ जाण्यास बंदी घातली असूनही धबधब्यात पर्यटकांची गर्दी कायम आहे. ...
आपल्या मुलीच्या सासूच्या श्राद्धासाठी वैतरणा खाडीच्या पुलावरून पायी वाढीव गावात जाणाऱ्या रमेश माळी (४५, रा.खार्डी) यांना एक्स्प्रेसने उडवल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी घडली. ...
मुंबई - अहमदाबाद महामार्गाच्या बाजूलाच असलेल्या शिवापाडा परिसरातील चाळीच्या बाजूलाच असलेल्या अनधिकृत इंडस्ट्रीज कंपनीच्या २० ते २५ फूट उंचीच्या झुकलेली भिंत चाळीवर पडण्याची भीती नागरिकांना सतावते आहे. ...